श्रेयवादाची लढाई ही फोल वाटणारी व उथळ स्वरूपाची – डॉ. मोहन खंडू शेलार, प्रा. ज्ञानेश्वंर भास्कार दराडे*
*श्रेयवादाची लढाई ही फोल वाटणारी व उथळ स्वरूपाची – डॉ. मोहन खंडू शेलार, प्रा. ज्ञानेश्वंर भास्कार दराडे*
येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष मा. आ. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्याने येवला मतदारसंघासह नाशिक जिल्ह्यात विकासाची गंगा आली. हजारो कोटी रुपयांचा निधी गेल्या 15 वर्षात भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झाला आहे. परंतु राज्यात झालेल्या अपघाती सत्तांतर नाट्यामुळे भुजबळ साहेबांच्या कामाची श्रेय घेण्यासाठी काहीजण पुढे सरसावत आहेत. येवला तालुक्याला टँकरमुक्तीच्या दिशेने नेणारे व मतदार संघातील माय माऊलीच्या डोक्यासवरचा हंडा उतरवून घरोघर पाणीपुरवठा करण्यासाठी मा. भुजबळ साहेबांच्या माध्यमातून 38 गाव पाणीपुरवठा योजनेकरीता 184 कोटी रुपये मंजुर झाले आहे. आशिया खंडात आदर्शवत म्हणून नावारूपाला आली आहे. त्याच धर्तीवर राजापूरसह 42 गाव पाणीपुरवठा योजना, धुळगाव 17 गाव पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यारंभ आदेश पारित झाला आहे. भुजबळ साहेबांच्या सत्ताकाळात महाविकास आघाडी सरकारच्या काळातील या योजनांना सत्ता गेल्यानंतर देखील पाठपुरावा सुरूच होता. शेतकऱ्यांची जमीन मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. जमीन खरेदीसाठी शासनाचा निधी उपलब्ध नव्हता तशी तरतुदी नव्हती. तरीदेखील भुजबळ साहेबांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांची खाजगी जमीन शासनास मोफत मिळवून दिली. सदर जमीन मिळवण्याच्या प्रक्रियेत अनंत अडथळे निर्माण करण्याचा राजकीय स्वार्थापोटी प्रयत्न केला गेला. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, मात्र साहेबांच्या शब्दाला मान देऊन राजापूर येथील स्थासनिक शेतक-यांने या योजनेसाठी आपली स्वपतःची जमीन दान दिली आहे.
आज रोजी सदर योजनेचे काम सुरु झाले असून सदर योजनेला काही निधी मा. भुजबळ साहेबांनी उपलब्ध करुन दिला आहे. 184 कोटी रुपयांची ही योजना लवकरच कार्यान्वित होऊन तालुका टँकरमुक्त होणार आहे. हे सामर्थ्या फक्ता भुजबळांमध्येरच आहे.
धुळगाव 17 गाव पाणीपुरवठा योजने करीता रु. 125 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यारंभ आदेश पारित झाला आहे. पिंपरी येथील शासनाची जमीन सदर योजनेसाठी प्रस्तावित असून उर्वरित दोन एकर शेती सदर योजनेस देण्यासाठी शासनस्तरावर भुजबळ साहेब प्रयत्न करत आहेत. सदर योजनांची कामे आगामी दोन वर्षात पूर्ण होणार असून राज्यातला पहिला टँकरमुक्त तालुका म्हणून येवल्याची नोंद होईल. या मागचे परिश्रम भुजबळ साहेबांचेच !!
पिण्याच्या पाण्याच्या सर्व योजना पूर्णत्वाकडे जात असताना दुष्काळी येवला तालुक्याला कालव्याच्या माध्यमातून ओलिताखाली आणण्याचे काम देखील भुजबळ साहेबांच्या माध्यमातून अंतिम टप्प्यात आहे. गुजरातला वाहून जाणारे पाणी येवल्यासारख्या दुष्काळी भागात डोंगर पोखरून बोगदा करून 162 किलोमीटर पोहोचवणे हे शब्दात मांडण्याच्या पलीकडे आहे. पालखेड डावा कालवा नेहमीच निफाड मध्यें फुटून द्राक्ष बागा जगविणारा कालवा होता. भुजबळ साहेबांच्या माध्यमातून कालव्याचे पाणी सुरळीतपणे 46 ते 52 चारी पर्यंत पोहोचू लागले आहे.
सदर कालव्याच्या अस्तरीकरणासाठी कोट्यावधी रुपयांचे काम मंजूर असून ते सुरूही झाले आहे. प्रत्येक कामासाठी अहोरात्र प्रयत्नांची पराकष्टा करणारा नेता म्हणून भुजबळ यांची ओळख आहे. मात्र त्यांच्या कामाचे कोणी श्रेय घेत असेल तर दुर्दैव व हस्या्स्प द आहे.
भुजबळ साहेबांच्या माध्यमातून खैराबाई बंधारा राजापूर येथे पूर्वी झाला त्यातून बरेचसे क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ममदापूर येथील मेळाच्यास बंधा-याचे सुदधा 6.50 कोटीचे टेंडर होऊन वनविभागाची शेवटची परवानगी मिळाल्यातवर लगेच बंधा-याच्याह कामास सुरवात होणार आहे. देवणाचा, मेळाचा बंधारा निविदा झाल्या असून जमिनीच्या परवानगीसाठी अंतिम टप्प्यात आहे. येवला राजापूर रोडचे कामही मा. साहेबांच्या माध्यमातून झाले आहे
2014 पासून येवल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासात्मक बदल झाले असून, येवल्याच्या जनतेला या विकास प्रक्रियेचा नायक माहीत असून ते सामर्थ्य भुजबळ साहेबांमध्येच आहे. त्यामुळे श्रेयवादाची लढाई ही फोल वाटणारी व उथळ स्वरूपाची आहे