येवला लासलगांव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी आणण्याचे बळ फक्त आणि फक्त भुजबळांमध्ये
येवला मतदार संघाचे भाग्यविधाते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी येवल्यातील काही लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न सुरू आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन न केलेल्या कामांची प्रसिध्दी करून श्रेय लाटत आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. परंतु त्यांचा हा प्रयत्न कधीही सफल होऊ शकत नाही. मतदारसंघातील नागरिक अतिशय सुज्ञ आहे. खोट्या प्रसिद्धीला ते कधीही भुलनार नाही. लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मतदासंघात केलेल्या विकास कामांबाबत आम्ही सत्य परिस्थितीत आपणासमोर प्रसिध्दी पत्रकान्वये मांडत आहोत.
*येवला लासलगांव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी आणण्याचे बळ फक्त आणि फक्त भुजबळांमध्ये*
येवला मतदारसंघाचा विकास हाच माझा ध्यास या घोषणेने येवल्याच्या जनतेची स्वप्नपूर्ती झाली आहे. 2004 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेच्या आग्रहास्तव भुजबळ साहेबांनी येवलेचे नेतृत्व स्वीकारले. वास्तविक शहरी राजकारणात वाढलेल्या भुजबळ साहेबांना ग्रामीण प्रश्न तसा वेगळा विषय होता मात्र ‘ढाण्या वाघाला’ काहीही अशक्य नसते, त्याचप्रमाणे वर्षानुवर्ष नित्याचाच ठरलेला दुष्काळ, विजेची अनियमीतता, रस्त्याची झालेली चाळण त्याचबरोबर शिक्षणाच्या असुविधा, अशा अनेक समस्यांचा डोंगर उभा होता परंतु 2004 नंतर या मतदारसंघाला भुजबळ साहेबांचे नेतृत्व लाभल्यापासून हजारो कोटी रुपयांची विविध विकासकामे सहजपणे पूर्णत्वास जाऊ लागली तर अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलेले आहे.
प्रामुख्याने शेतकरी बांधवांना मुबलक वीजपुरवठा व्हावा म्हणून मतदारसंघात कानळद, चिंचोंडी, मुखेड, विखरणी, कोटमगाव, गवंडगांव, खडक माळेगाव व मरळगोई या ठिकाणी वीज उपकेंद्रे उभारण्यात आली असून जऊळके, सोमठाण देश, कोटमगाव, कुसुर, बल्हेमगांव, अंगुलगांव व येवला शहर या ठिकाणी नवीन उपकेंद्र मंजूर करण्यात आलेली आहेत. या सुविधांमुळे विजेची समस्या संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. तसेच तालुक्या त नविन 132 KV चे विद्युत केंद्र अंदाजे किंमत 125 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्ता.वित केलेले असुन थोड्या दिवसात मा. भुजबळ साहेब शासनस्त रावरुन मंजुर करुन घेतील यात शंका नाही.
तसेच इतर जिल्हा मार्गांसह राज्यमार्गाचे नुतनीकरणासाठी सुमारे 600 कोटी रुपयांचा निधी खेचून आणण्यात भुजबळ साहेबांना यश आले असून त्यांच्या पाठपुराव्यामुळेच मतदारसंघातील पूल, रस्ते मजबूत करण्यात आले आहे. येवला शहरातील अनेक आकर्षक वस्तुच्या निर्मितीने शहराला सौंदर्य प्राप्त करून दिले आहे. त्याचबरोबर विद्यार्थी युवक युवतींना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आरोग्य विषयक समस्यांचा निपटारा करण्यासाठी मतदारसंघात देवगाव, खडक माळेगाव, राजापूर, भारम, मुखेड, पाटोदा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची तर एरंडगाव, निमगाव मढ, देवठाण, कातरणी, अंदरसुल, नगरसुल, तळवाडे या ठिकाणी उपकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे. अंदरसुल, निमगाव वाकडा येथील इमारती मंजूर करण्यात आल्या असून लवकरच कामाचा शुभारंभ करण्यात येईल.
ग्रामीण जनतेला भेडसावणाऱ्या वाहतूक समस्येला पर्याय म्हणून कोटमगाव ता. येवला येथे 27 कोटी रुपयांचा तर लासलगाव ता. निफाड येथे 70 कोटी रुपयांचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. तसेच सारोळे येथील विनता नदीवर 8 कोटींचा, खेडलेझुंगे ता. निफाड येथील गोदावरी नदीवर 8 कोटींचा पूल बांधण्यात आल्याने या परिसरातील नागरिकांना सातत्याने होत असलेल्या असुविधांपासून मुक्ती मिळाली आहे.
मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत कार्यालये तर प्रत्येक गावांना स्मशानभूमी शेड बरोबरच अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
मतदारसंघातील सजेच्या ठिकाणी तलाठी कार्यालये तसेच मंडळ अधिकारी कार्यालये व निवासस्थानांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ‘वाडी येथे अंगणवाडी’ ही योजना राबवण्यात आली आहे.
मतदारसंघातील भाविकांची श्रद्धास्थाने असलेल्या धार्मिक स्थळांच्या विकासकामांसाठी 110 कोटी रुपये मंजूर करून या मतदारसंघातील धार्मिक क्षेत्रांना पर्यटनस्थळांचे स्वरूप प्राप्त करून देण्याची काम भुजबळ साहेबांच्या अथक प्रयत्नातून शक्य झाले आहे. तसेच मतदारसंघातील शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी ‘मातोश्री पानंद रस्ता’ योजनेतून 15 कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गोल्हेवाडी ते नगरसुल-पिंपळखुटे तिसरे ते तालुका हद्द तर वडगाव बल्हें ते बल्हेगाव, गोल्हेवाडी ते सायगांव तसेच गाजरवाडी ते तामसवाडी ते तालुका हद्द, विंचूर ते डोंगरगाव रस्ता ते रामा-7 ते देशमाने रस्ता, प्ररामा 0/00 ते 2/00 (चंद्रसूर्य मंदिर) ते शिवापूर मरळगोई खुर्द ते मरळगोई बुद्रुक रस्ता, देशमाने शिरसगाव लौकी पाटोदा ते आडगाव रेपाळ रस्ता या 60 कोटींच्या रस्त्यांना नुकतीच मंजुरी मिळाली असून लवकरच कामात सुरुवात करण्यात येईल.
मतदार संघातील अनुसूचित जाती व आदिवासींच्या पाल्यां साठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भव्य अशा निवासी वस्तीगृहांची निर्मिती करण्यात भुजबळ साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. तसेच खडक माळेगांव येथे 25 कोटी रुपये किंमतीचे लघु पाटबंधा-याचे काम चालु असुन काळधोंडी नदीवर 5 कोटी रुपयांचे काम सुरु आहे.
त्यानच प्रमाणे 2004 ते 2014 या 10 वर्षातील संपूर्ण आमदार निधी हा मतदारसंघात बंधा-याच्या कामासाठी खर्च करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनी ओलिताखाली आल्याव आहेत. केवळ भुजबळ साहेबांच्या प्रयत्नामुळेच या मतदारसंघाचा आर्थिक स्तर उंचावला असून त्याचे श्रेय भुजबळ साहेबांनाच द्यावे लागेल.
आ. भुजबळ साहेबांच्या दमदार नेतृत्वा्मुळेच येवला लासलगांव विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकासकामे साकारण्यात आली असुन या पुढील काळातही त्यांच्याच नेतृत्वानमुळे विकासाची घौडदौड यापेक्षाही वेगवान गतीने सुरुच राहील. यापुर्वी या मतदारसंघात झालेल्या विविध निवडणूकींच्यास निकालातुन मतदारांनी अनेकदा विश्वास व्यवक्तस करून विजय मिळवून दिला आहे. या मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी आ. भुजबळ साहेब अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या मतदारसंघाला सर्वोत्तमण बनविण्यारचे त्यांचे प्रयत्नस जनता जाणून आहेत. यात तिळमात्र शंका नाही.
श्री. वसंतराव पवार, अध्ययक्ष येवला विधानसभा मतदारसंघ, रा.कॉ. पार्टी
श्री. साहेबराव मढवई, अध्ययक्ष- राष्ट्रावादी कॉग्रेस पार्टी, येवला तालुका
श्री. ज्ञानेश्वमर शेवाळे कार्याध्ययक्ष- राष्ट्र वादी कॉग्रेस पार्टी, येवला तालुका
श्री. बाळासाहेब लोखंडे, स्विय सहाय्यक, मा.आ. भुजबळ साहेब.