मुक्ती भूमीचा विकास भुजबळांमुळेच-माजी सभापती प्रकाश वाघ / मुक्ती प्रतिष्ठान विश्वस्त भागिनाथ पगारे/ मुक्ती प्रतिष्ठान विश्वस्त सुभाष गांगुर्डे*
*मुक्ती भूमीचा विकास भुजबळांमुळेच-माजी सभापती प्रकाश वाघ / मुक्ती प्रतिष्ठान विश्वस्त भागिनाथ पगारे/ मुक्ती प्रतिष्ठान विश्वस्त सुभाष गांगुर्डे*
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या ऐतिहासिक मुक्तीभूमीच्या विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आ. छगनरावजी भुजबळ यांनी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून जगभरात नावलौकिक व्हावा अशा नेत्र दीपक वास्तूंची निर्मिती केली आहे.
13 ऑक्टोबर 1935 साली डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा येवल्यात दिल्यापासून या भूमीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. अनेक वर्षे होऊनही या स्थानाच्या विकासाबद्दल उदासीनता दिसून येत असल्याने तमाम आंबेडकरी अनुयायांमध्ये नैराश्याचे वातावरण होते, मात्र 2004 नंतर या मतदारसंघाला फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे पाईक असलेल्या भुजबळ साहेबांचे नेतृत्व लाभल्यामुळे मुक्तीभूमी निर्माणच्या आशा पल्लवीत झाल्या. आणि खरोखरच विधानसभेत सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर सर्वप्रथम शुभारंभ झाला तो मुक्तीभूमी विकासासाठी घेतलेल्या पहिल्या वहिल्याआ शासकीय बैठकीने! एक आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून या बैठकीचे आम्ही साक्षीदार आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याै जिवन चरित्राचा विचार करता त्यांच्या आयुष्यातील तीन प्रमुख स्थानांना विशेष महत्त्व आहे मुक्तीभूमी, दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी यापैकी 2004 पूर्वीची मुक्तीभूमी व त्यानंतरची आजची मुक्तीभूमी यामधील बदल कोट्यावधी आंबेडकरी अनुयायी जाणून आहेत. संपूर्ण जगाने मुक्तीभूमी विकासाची नोंद घेतली आहे या संपुर्ण निर्माणाचे शिल्पकार म्हणून या मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी उपमुख्यमंत्री मा. आ. छगनरावजी भुजबळ साहेब यांना ओळखले जाते. केवळ भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांमुळेच व विशेष पाठपुराव्यामुळेच मुक्तभूमीचा कायापालट झाला असून त्यांच्याच पाठपुराव्यामुळे आजही या ठिकाणी विकास कामे सुरू आहेत.
त्याचप्रमाणे जागतिक पर्यटकांची हजेरी लक्षात घेता नवीन कृती आराखडा तयार करून ‘ऐतिहासिक स्मारक’ निर्माणाचे भुजबळ साहेबांची स्वप्न असून त्यास यश आल्याशिवाय राहणार नाही