भुजबळ साहेबांमुळेच येवल्याच्या सौंदर्यात भर आकर्षक वास्तुंच्या निर्माणामुळे कायापालट झाला*

*भुजबळ साहेबांमुळेच येवल्याच्या सौंदर्यात भर आकर्षक वास्तुंच्या निर्माणामुळे कायापालट झाला*
नागरीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या आणि आधुनिकीकरणाची आस लागलेल्या येवल्याला 2004 नंतर भुजबळ साहेबांचे नेतृत्व लाभल्यामुळे खऱ्या अर्थाने येवला शहराच्या मूलभूत सुविधांबरोबरच सौदर्यीकरणात भर घालणाऱ्या आकर्षक वास्तुंच्या निर्माणामुळे येवला शहराने राज्यातील प्रगतिशील शहरांमध्ये स्थान मिळवले आहे.
शेकडो कोटी रुपयांच्या निधीमधुन मध्यवर्ती प्रशासकीय संकुल, उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, नाट्यगृह, बोटिंग क्लब, मुक्तीभुमी स्मारक, पोलीस वसाहत, तात्या टोपे स्मारक, न्यायालय इमारत, ट्राफिक पार्क, अहिल्याबाई होळकर घाट, नगरपालिका शॉपिंग सेंटर, आदिवासी वस्तीगृह, पशुसंवर्धन दवाखाना, नगरपालिका प्रशासकीय इमारत, तालुका पोलीस स्टेशन, आयटीआय कॉलेज, तांत्रिक शाळा आदींसह अनेक इमारतींचे कामे पुर्ण झाल्याने शहरवासीयांनी 2004 पूर्वीचे आणि नंतरचे शहर अनुभवले आहे.
शहर व परिसरातील रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांमुळेच शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
सुशोभीकरणाबरोबरच पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भुजबळ साहेबांनी विशेष भर दिला असून संपूर्ण शहरातील गटारी भूमिगत करण्यासाठी नुकतेच 79 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच कामाचा शुभारंभ होणार आहे.
शहरालगत 27 कोटी रुपयांचा उड्डाणपूल उभारून ग्रामीण जनतेचा होत असलेला वेळेचा अपव्यय टाळला, त्याचबरोबर दैनंदिन होणारे अपघातही टाळले आहेत.
मुस्लिम बहुल परिसरात गोरगरिबांच्या मंगल कार्यासाठी शादी हॉलची निर्मिती करण्यात आली असून छोट छोट्या गल्ल्यांतील रस्त्यांची काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. यासाठी 11 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
नवबौद्ध घटकांचा विकास योजनेतून शहरातील दलित वस्त्यांमध्ये 10 कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली असून 15 कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
येवला शहरामध्ये शेकडो कोटी रुपयांच्या विकासकामामुळे येवला शहराची राज्यातील प्रगत शहरांमध्ये नोंद करण्यात आली असून केवळ भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामुळेच हा कायापालट होऊ शकला, आणि यापुढेही होत राहील यात शंका नाही.
महाराष्ट्रश राज्याळला पथदर्शी ठरणारी शिवशृष्टी येवला शहरात साकारण्या,त येणार असुन मा. आ. भुजबळ साहेबांच्यां अथक प्रयत्नां तुन 4 कोटी रुपये याकामी मंजूर करण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ तात्काळलीन उपमुख्यचमंत्री अजितदादा पवार यांच्याठ शुभहस्तेप करण्यात आला.