सुप्रीम कॉलनीत हातात तलवार घेऊन दहशत माजवणऱ्या हद्दपार आरोपी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात
सुप्रीम कॉलनीत हातात तलवार घेऊन दहशत माजवणऱ्या हद्दपार आरोपी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरात सुप्रीम कॉलनी परिसरातील हातात तलवार घेऊन दहशत माजवणऱ्या फरार आरोपी एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय-२२) रा. सुप्रीम कॉलनी जळगाव, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, दिनकर उर्फ पिण्या सुप्रीम कॉलनी परिसरातील रामदेव बाबा मंदिर परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनी माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहाकारी पोलीस उप निरीक्षक आनंद सिंग पाटील, पोहेका गणेश शिरसाळे, पो.नाइक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पो.का किरण पाटील, नाना तायडे, व आदींनी पुढील तपास आणि कारवाईसाठी रवाना केले. तपास व शोध पथकाने दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण यास तलवारीसह ताब्यात घेत अटक केली.
अटकेतील आरोपी दिनकर उर्फ पिण्या रोहिदास चव्हाण यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु.र.नं. १४५/२०२३ मुंबई पोलीस कायदा कलम आर्म अॅक्ट ४/२५ तसेच मुंबई पोलीस अधिनियम ३७(१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.