सीपीआरच्या लिपिकास लाच घेताना केली अटक*
*सीपीआरच्या लिपिकास लाच घेताना केली अटक*
प्रतिनिधी: रोहित डवरी
हातकणंगले, पेठवडगाव
कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये परिचारिकेकडून पाच हजार रुपये ची लाच घेताना केली अटक यामध्ये वरिष्ठ लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. हुसेनबाशा कादरसांहब शेख (वय ४७ शनिवार पेठ कोल्हापूर ,मूळ राहणार कर्णिक नगर सोलापूर ) असे अटकेत असणाऱ्या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. तर ही कारवाई गुरुवारी ( दि ९) सीपीआर मध्ये करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार परिचारिकेस पदोन्नती आणि नोकरीतील अन्य शासकीय लाभ मिळवण्यासाठी स्थायित्व प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक्राकडे अर्ज केला होता.२० दिवसापूर्वी त्यांना प्रमाणपत्र मिळाले. प्रमाणपत्र मिळवून दिल्याबद्दल वरिष्ठ लिपिक शेख यांनी तक्रारदार परिचारिकेकडे पाच हजार रुपये ची लाचीचे मागणी केली होती. याबाबत संबंधित परिचारिकेने गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीशी पडताळणी करून पथकाने शेख यांच्या कार्यालयात सापळा रचला. पाच हजाराची लाच घेताना शेख याला रगेहात अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस कर्मचारी नितीन कुंभार ,विकास माने, सचिन पाटील ,सुरज अपराध, रुपेश माने, संजीव बंबरंगेकर, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.