महाराष्ट्रातील राजकारणातला पहिला सामाजिक प्रयोग विकास पुरुष आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांच्या स्वखर्चातून मतदारसंघातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा व सेतू सुविधा घरपोच पुरविण्यात येत
महाराष्ट्रातील राजकारणातला पहिला सामाजिक प्रयोग
विकासपुरुष आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे यांच्या स्वखर्चातून मतदारसंघातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा व सेतू सुविधा घरपोच पुरविण्यात येत आहेत, आज या सुविधांचा शुभारंभ झाला.
नांदगाव तालुका पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार
मोफत फिरता दवाखाना
मोफत शासकीय कार्यालयं सुविधा
मोफत जेसीबी सुविधा या आधीच नागरिकांसाठी उपलब्ध झालेले आहेत.
नांदगाव तालुक्यातील आमोदे व बोराळे गावातून या सुविधांचा शुभारंभ आज करण्यात आला.
सुसज्ज अद्ययावत उपकरणांसह दोन गाड्यांचे युनिट, डॉक्टर, सिस्टर, मदतनीस, डोळ्यांचे डॉक्टर, सेतू कार्यालय प्रतिनिधी व स्टाफ सोबत आज सकाळी 9 वाजता दोन्ही गावात पूजा करत नारळ फोडून या
सेवा देण्यास सुरुवात करण्यात आली.
ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत या सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली.
या प्रसंगी तात्काळ मोफत चष्मा वाटप करण्यात येत आहे, तसेच तात्काळ औषधे ही देण्यात येत आहेत.
सदर सुविधा संपूर्ण मतदारसंघात नियोजन करून उपलब्ध होणार आहेत, प्रत्येक गावात होणाऱ्या कॅम्प ची माहिती दोन दिवस आधी गावात गाडी फिरवून, हॅण्डवेलं द्वारे व सोशल मीडिया तून दिली जाणार आहे.
प्रत्येक नागरिकाने या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले आहे.