छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून….* *मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत येवला मतदारसंघातील गाजरवाडी वडांगळी रस्त्याच्या सुधारणेसाठी २ कोटी ८८ लक्षच्या कामास मंजुरी*
*छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून….*
*मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत येवला मतदारसंघातील गाजरवाडी वडांगळी रस्त्याच्या सुधारणेसाठी २ कोटी ८८ लक्षच्या कामास मंजुरी*
*नाशिक,येवला,दि.१० मार्च :-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ नाबार्ड अर्थसहाय्यीत ग्रामीण पायाभूत विकास निधी मालिका २८ अंतर्गत येवला मतदारसंघातील गाजरवाडी ते वडांगळी रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ८८ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असून परिसरातील नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.
येवला मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ नाबार्ड अर्थसहाय्यीत ग्रामीण पायाभूत विकास निधी मालिका २८ अंतर्गत येवला मतदारसंघात निफाड तालुक्यातील गाजरवाडी – तामसवाडी ते तालुका हद्द वडांगळी या ४ किलोमीटर रस्त्याच्या सुधारणेसाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ८८ लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाची पुढील पाच वर्ष देखभाल दुरुस्ती कंत्राटदाराकडून करण्यात येणार असून त्यासाठी १३ लक्ष ५८ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे या रस्त्याला झळाळी प्राप्त होऊन परिसरातील नागरिकांचे दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.