ताज्या घडामोडी

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस जिल्हापेठ पोलिसा कडून अटक

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस जिल्हापेठ पोलिसा कडून अटक

प्रतिनिधी शाहिद खान

जळगाव शहरातील विसाजी नगरात जिल्हापेठ पोलीस स्टेशन CCTNS CR 88/2023 भा.द.वि क 379 अन्वये दाखल गुन्ह्यात नामे अमीत राजेंद्र शर्मा वय 37 रा विसनजी नगर ता. जि. जळगांव
यांच्या घराच्या मागील बाजूस लिफ्टचे काम चालू होते त्या ठिकाणी लोखंडी प्लेट तसेच लोखंडी साहित्य असे होते दिनांक 08/03/2023 रोजी रात्री साधारण 09:00 ते दिनांक 9/3/2023 रोजी चे सकाळी 06:00 चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोट्याने
१) 4200 रुपये किमतीचे लोखंडी चार प्लेट सुमारे पंधरा किलो ग्रॅम वजनाची
२) 1050 रुपये किमतीचे लोखंडी पाईप सुमारे अडीच फूट लांबीचे असे चोरून नेले होते सदर गुन्ह्यात पो.हे.कॉ सलीम तडवी, पो कॉ. रवींद्र साबळे अशांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाल्याने संशयित नामे राहुल संतोष भोई रा.गडपुरा ता.काटोल जि.नागपूर हली मु.रेल्वे स्टेशन फुटपाथवर
जळगाव यास चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने चोरलेला मुद्देमाल हा जस ग्राउंड जवळ शासकीय तंत्रनिकेतन च्या बाजूला लपवून ठेवल्याचे सांगितले सदरची संपूर्ण हकीकत माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी पोलीस उपअधीक्षक संदीप गावित व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाणे लागलीच पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख पोहे का सलीम तडवी , पोहे कॉ गणेश पाटील, पो.कॉ.रवींद्र साबळे, पो.कॉ.समाधान पाटील पुढील योग्य ती कारवाई करण्यासाठी आदेशित केल्याने पथकाने सदर ठिकाणी जाऊन चोरीस केलेल्या संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केलेला असून आरोपी यास अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास पो.हे.कॉ.सलीम तडवी हे करीत आहे.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!