ताज्या घडामोडी

मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथि निमित्त आदरांजली.*

प्रतीनीधी सचिन वखारे,फोटोग्राफर येवला

*मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथि निमित्त आदरांजली.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रांतिज्योति सावित्रीबाई फूले यांना पुण्यतिथि निमित्त प्रतिमा पुजन करुन आदरांजली
वाहण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून भागवत हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.शीतल तुषार भागवत ह्या होत्या तर अध्यक्षस्थानी रामनाथकाका एंडाईत हे होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.यानंतर शिक्षक अमोल आहेर यांनी प्रस्तावना व पाहुण्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला.यानंतर विद्यार्थिनी भाग्यश्री देवरे,मानसी शिनगारे, प्रगती दाणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर प्रमुख पाहुण्या डॉ.शीतल भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केल्या मुळेच आज मी डॉक्टर झाले.एक स्त्री गृहिणी, शिक्षिका, डॉक्टर, इंजिनियर अशा विविध पदावर यशस्वी होत आहे.
याप्रसंगी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मकरंद सोनवणे,सरचिटणीस अमोल सोनवणे,अंदरसुल ग्रामपालिकेच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ.विनिता अमोल सोनवणे,प्रिंसिपल अल्ताफ खान सह सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!