ताज्या घडामोडी

छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून येवला मतदारसंघातील रस्त्यांना मिळणार झळाळी….*

*छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून येवला मतदारसंघातील रस्त्यांना मिळणार झळाळी….*

*अर्थसंकल्पातून येवला मतदारसंघात रस्ते व पुलांची ३१ कोटी ९० लक्षची विकासकामे मंजूर*

*रस्ते व पुलांच्या कामातून येवला मतदारसंघातील नागरिकांना मिळणार दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा*

*नाशिक,दि.१० मार्च :-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष पाठपुराव्यातून राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात रस्ते व पुलांची विविध विकास कामे मंजूर झाली असून यासाठी ३१ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मतदारसंघातील रस्त्यांना झळाळी मिळणार असून नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.

येवला मतदासंघांत विकासाची गंगा कायम असून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे विविध योजनांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मंजूर झाली आहे. यामध्यमातून मतदारसंघात नागरिकांना विविध पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहे. तसेच विविध विकास कामांसाठी छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यानुसार राज्याच्या अर्थ अर्थसंकल्पातून विविध रस्त्यांची व पुलांची ३१ कोटी ९० विकासकामे मंजूर झाली आहे. त्यामुळे येवल्यातील रस्त्यांना झळाळी मिळणार आहे.

यामध्ये येवला तालुक्यातील मातुलठाण-धामणगांव-अंदरसुल ते बोकटे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १६१ किमी ५/३०० ते ८/०० मध्ये रुंदीकरण व डांबरीकरण करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष, पाटोदा-सातारे-एरंडगाव-रवंदा प्रमुख जिल्हा मार्ग १७८ रस्त्याची ३/५०० ते १०/८०० मध्ये सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ९० लक्ष, येवला-नागडे-धामणगाव-भारम वाघाळे छ.संभाजीनगर हद्द रस्ता राज्य महामार्ग ४१२ सा.क्र.१५/४०० ते १६/०० वर १६ /३०० ते २७/५०० या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३ कोटी ५० लक्ष, राज्य महामार्ग ७ ते लासलगाव-सोमठाणदेश-पाटोदा-ठाणगाव-सावरगाव-धामोडे-नगरसूल-वाईबोथी-न्याहारखेडे खु.भारम ते राज्य महामार्ग ४१२ ला मिळणारा रस्ता राज्य महामार्ग ४५२ मध्ये २८/०० ते २९/०० व ३५/८०० ते ३९/०० या लांबीत रस्ता रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्यासाठी ३ कोटी तर नाशिक-निफाड-येवला रस्ता १९६/०० ते २०१/०० या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी ६ कोटी रुपये, नाशिक-निफाड-येवला-वैजापूर-छ. संभाजीनगर रस्त्यावर गोई नदीवर सा.क्र.२०९/१०० मध्ये मोठ्या पुलाचे पुर्नरबांधणी करण्यासाठी व २०२/५०० ते २०६/५०० या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ७.५० कोटी रुपये निधी असा एकूण २५ कोटी ४० लक्ष रुपये निधीच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.

निफाड तालुक्यातील डोंगरगाव विंचूर रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १२५ मध्ये ३६/४०० ते ३७/७०० या रस्त्याचे काँक्रीटीकरण व गटारीचे बांधकाम करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष, कोळगांव ते कानळद रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १०५ किमी ११/९०० ते १४/९०० ची सुधारणा करण्यासाठी १ कोटी ५० लक्ष, विंचूर-विठ्ठलवाडी-कोटमगाव रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग ४० /०० ते ४१ /५०० ची सुधारणा करण्यासाठी १ कोटी, निमगाव वाकडा- भरवसफाटा ते देवगाव रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १८७ मध्ये ५/०० ते १० /०० रस्त्याची सुधारणा करण्यासाठी २ कोटी ५० लक्ष असे एकूण ६ कोटी ५० लक्षच्या विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. या विकास कामांना लवकरच सुरुवात होणार आहे.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!