जागतिक महीला दिन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येवला नगरपालीचे तत्पर मुख्याधीकारी श्री नागेंद्र मुतकेकर
सचिन वखारे,:-
येवला… जागतीक दिनाचे औचित्य साधून शेतीकाम करणाऱ्या कष्टकरी महिलांचे देखील समाजाप्रती मोठे योगदान आहे.. अशा महिलांचा देखील यथोचीत सन्मान, सत्कार होने उचीत व अत्यावशक आहे. हि बाब लक्षात घेऊन नेहमीच विधायक काम करणाऱ्या धडपड मंच तर्फे कोटमगांव (देवीचे) येथील कष्टकरी महिलांचे वस्तीत अबालवृद्धांचे उपास्थितीत कोऱ्या साड्या, गुलाब पुष्प देऊन उत्साही वातावरणात सन्मान करण्यात आला.
या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी येवला नगरपालीचे तत्पर मुख्याधीकारी श्री नागेंद्र मुतकेकर हे होते. ते आपल्या मनोगतात म्हणाले. महिला या पुरुषापेक्षा त्यांचे अंगी सहनशक्ती जास्त असते. या महिला आपल्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात, पण स्वतःची काळजी मात्र घेत नाही. त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. ” असे सांगून धडपड मंचने हा आगळा-वेगळा व आदर्श असा कार्यक्रम
केला बद्दल मंचचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. आपल्या प्रास्तावीकात प्रभाकर झळके यांनी महिला दिन साजरा करण्या मागील आपली भूमिका विषद केली. नारायणमामा शिंदे म्हणाले. “महिला दिनाचे निमीत्ताने या कष्टकरी महिलांचा सन्मान हा त्यांच्याच वस्तीत त्यांचे बांधवांचे उपास्थितीत केल्या बद्दल आनंद सक्त केला.” किशोर सोनवणे आपल्या मनोगतात म्हणाले,” या महिला आपल्या घराप्रती, असलेली जबाबदारी पार पाडीत असतांनाच कुष्टाची कामे करून आपला प्रपंचाला आर्थिक प्राप्ती करून देतात ही कौतुकाची बाब आहे. हा त्यांचा केलेगेलेला सन्मान हा अनुकणीय असाच आहे, “
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सर्व श्री…… डॉ. सागर बोळे, उपसरपंच प्रविण कारभारी मोरे, माजी सरपंच नामदेव बाबुराव माळी, नवनाथ धोंडीराम मोरे, गणेश मोरे, लक्ष्मण सोनवणे यांनी ग्रामस्था तर्फे आयोजकांचे आभार मानून धन्यवाद दिले.प्रा. श्री. हत्ता नागडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सर्वांचे आभार मानले. हा देखना कार्यक्रम यशस्वीपणे पारपाडण्यासाठी सर्वश्री मयुर पारवे, मुकेश लचके, दिपक कासले, मंगेश पैठणकर, गोपी दाणी, शुभम सुकासे, वरद लचके, दत्ता कोट मे यांनी अतीशय परीश्रम घेतले. तेथील सर्व उपस्तीत बालगोपालांना खाऊ वाटण्यात आला,