यती सुशील गुजराथी यांची भारतीय टेनिस संघाच्या कर्णधार पदी निवड; माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव*
*यती सुशील गुजराथी यांची भारतीय टेनिस संघाच्या कर्णधार पदी निवड; माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गौरव*
नवभारत क्रीडा मंडळाचे राष्ट्रीय लॉन टेनिस खेळाडू यती गुजराथी यांची ४५ वर्ष वयोगटातुन जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली. आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला येथील कार्यालयात गौरव करण्यात आला.
जागतिक मास्टर टेनिस स्पर्धा १९ ते २६ मार्च दरम्यान तुर्की येथे होणार असून या स्पर्धेसाठी नुकत्याच ऑल इंडिया टेनिस असोसिएशने ४५ वयोगटातील जाहीर केलेल्या संघात यती सुशीलचंद्र गुजराथी यांची भारतीय टेनिस संघाच्या कर्णधार पदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी सुशीलचंद्र गुजराथी,राजेश भांडगे, यती गुजराथी यांच्या पत्नी पारुल गुजराथी, राजेंद्र भावसार, प्रशिक्षक शिरीष नांदुर्डीकर, किरण कुलकर्णी, प्रीतम पटणी, अंकुश कलंत्री, श्री.शिंदे, बापू पगार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.