माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला मदातरसंघातील विकास कामांचा आढावा*मतदासंघातील सुरू असलेली विकासाची कामे तातडीने पूर्ण करा – छगन भुजबळ*
मतदासंघातील सुरू असलेली विकासाची कामे तातडीने पूर्ण करा - छगन भुजबळ*
*माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवला मदातरसंघातील विकास कामांचा आढावा*
*मतदासंघातील सुरू असलेली विकासाची कामे तातडीने पूर्ण करा – छगन भुजबळ*
*येवला,दि.५ मार्च :-* मतदारसंघात सुरू असलेली विकासाची सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. विकासकामांमध्ये दफ्तर दिरंगाई सहन केली जाणार नाही असा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
छगन भुजबळ यांनी आज येवला संपर्क कार्यालयात कांदा खरेदी बाबत सविस्तर चर्चा करून कांदा खरेदीचा आढावा घेतला.तसेच मतदरसंघांतील रस्ते, महावितरणची कामे, पाणी टंचाई, जलसंधारण, पाणी पुरवठा योजना, रोजगार हमी, जलयुक्त शिवार, सहकार, कृषी विभागाच्या योजनांसह मतदार संघात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी अन्सार शेख, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता अभिजित शेलार, गणेश चौधरी, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी.एम.कुलकर्णी, शाखा अभियंता राहुल भामरे, येवला नगरपालिकेचे शहर अभियंता जनार्दन फुलारी, पाटबंधारे विभागाचे अमोल सुरडकर, अनिता सखदे, महावितरण विभागाचे अभियंता संदीप अस्वले, मिलिंद जाधव, येवला आगर व्यवस्थापक प्रवीण हिरे, वाहतूक निरीक्षक विकास वाहुल, फलोत्पादन अधिकारी हितेंद्र पगार, सहायक पोलीस निरीक्षक भिसे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, पांडुरंग राऊत, संतोष खैरनार, मकरंद सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर आदी उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, मतदासंघांत विजेचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नव्याने विद्युत उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्या उपकेंद्राचे कामे तातडीने सूरू करण्यात यावे, शेतकऱ्यांचे बंद ट्रान्सफार्मर लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावीत. टंचाईचे प्रस्ताव सादर करून टंचाईग्रस्त गावातील नागरिकांना पाण्याची कमतरता पडू देऊ नये अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
ते म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध योजनांतून सुरू असलेली रस्त्यांची कामे, जलसिंचन,पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. येवला शहरात स्वच्छता व सुशोभिकरनाची कामे करण्यात यावी अशा सूचना त्यांनी केल्या.
तसेच येवला आगारातील राहिलेली कामे, नवीन विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत अशा सूचना करत नाफेड कांदा खरेदी, कांद्याची होणारी आवक शिल्लक कांदा आणि येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी चर्चा केली.
तसेच शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत सूचना त्यांनी केल्या.