हनुमान नगरात एका बंद घरातून ९६ हजारांचा ऐवज लंपास
हनुमान नगरात एका बंद घरातून ९६ हजारांचा ऐवज लंपास
जळगाव: प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरात अयोध्या नगर परिसरातील हनुमान नगरात शुक्रवारी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करित ९६ हजारांचा लांबविला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, विशाल गोपाल पाटील ( वय-३६) रा. हनुमान नगर येथे परिवारास राहतात. ते १ मार्च रोजी धरणगाव तालुक्यातील कवठळ येथे नातेवाईकांनी लग्नाला गेले होते. त्यांचे वडील गोपाल पाटील हे शुक्रवारी सकाळी लग्नाला गेले. दिवसभर बंद असल्याचे पाहत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. गोदरेज कपाट उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त करीत तिजोरीतील किमती वस्तू चोरून नेल्या. घर उघडे दिसण्याचे पाहून शेजारी राहणार मावसभाऊ योगेश महाजन याने विशाल पाटील यांना याबाबत माहिती दिली. तिजोरीतील ९ हजार रोख ७० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या तसेच १७ हजाराचे सोन्याचे इतर दागिने असा ९६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अतुल वंजारी करित आहे.