एम.एस.जी.एस. शिक्षण संकुलात स्व.ॲड. सुभाषराव (अण्णा)सोनवणे यांना विनम्र अभिवादन.
*एम.एस.जी.एस. शिक्षण संकुलात स्व.ॲड. सुभाषराव (अण्णा)सोनवणे यांना विनम्र अभिवादन.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल,सेमी इंग्लिश व ज्यु. कॉलेजमध्ये अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सरचिटणीस ॲड.स्व.सुभाषराव सोनवणे यांना द्वितीय पुण्यतिथी निमित्त आदरांजली देण्यात आली.कार्यक्रमासाठी प्रमूख पाहुणे म्हणुन डॉ.अमीत अशोक पुंड व डॉ.संदीप मारुती सोनवणे हे होते तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्व.सुभाषराव सोनवणे यांच्या प्रतिमेला व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचा परिचय अमोल आहेर यांनी उपस्थितांना करून दिला. संस्थेच्या वतीने डॉ.अमीत पुंड व डॉ.संदीप सोनवणे यांचा नारळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर स्वरा सोनवणे, प्रणिता कचरे,अदिती खैरनार, समृद्धी आहेर यांनी स्व.सुभाषराव सोनवणे यांच्या जीवन कार्यावर आपले भाषण सादर केले. पुण्यतिथी निमित्त इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण व सायन्स ऑलम्पियाड स्पर्धेचे बक्षिस वितरण,तसेच सेमी विद्यालय व ज्यु. कॉलेजमध्ये विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष सुदामराव सोनवणे, डॉ. संदीप सोनवणे व अध्यक्षीय भाषण अरुण भांडगे सर यांनी करून स्व.सुभाषराव (अण्णा ) सोनवणे यांच्या स्मृतीस उजाळा दिला.
याप्रसंगी संस्थेचे खजिनदार मकरंद सोनवणे,सरचिटणीस अमोल सोनवणे, सह चिटणीस मयुर सोनवणे,संचालक प्रा.राजेंद्र गायकवाड, जीवनशेठ गाडे, उज्ज्वल जाधव,आकाश सोनवणे, जनार्दन जानराव, राजेंद्र सोनवणे,अंदरसुल ग्रामपालिका माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ.विनिताताई अमोल सोनवणे, रामनाथ काका एंडाईत,साहेबराव आहेर, द्वारकानाथ सोनवणे, अतुल गाडे, मंगेश शिंदे, अशोक एंडाईत, अंदरसुल ग्रामपालिका उपसरपंच किशोर बागुल,संदीप वाकचौरे, बाबासाहेब सोनवणे, पुंडलिक जानराव, प्रिंसिपल अल्ताफ खान, ज्यु.कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमीच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, प्रशांत बिवाल, अमजद अन्सारी, संदीप बोढरे, मनीष सैंदाने, अजीम पटेल, सुनील सपकाळ, सागर गाडेकर, सचिन बोढरे, शिवनाथ शिरसाठ, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, चेतना माकूने, सुनीता वडे, सुश्मिता देशमुख, आलिया खान, शोभा निकम, शर्मिला पवार,आरती गोरे, मयुरी टेके, निर्मला शिकारे यासह सर्व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.