दोघे कुविख्यात गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार
दोघे कुविख्यात गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव: सामाजिक शांततेला अडसर ठरु पाहणाऱ्या व पोलिस दप्तरी कुविख्यात म्हणून ख्याती असलेल्या दोघा संशयितांना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संदीप भास्कर ढोके, ( वय-२४) रा. गेंदालाल मिल जळगाव, व विशाल वाल्मीक जाधव, (वय-२३) रा. गेंदालाल मिल जळगाव, अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
संशयित विशाल व संदीप यांच्याविरुद्ध जबरी हाणामारी यासह गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत. संशय जामिनावर आल्यानंतर पुन्हा टोळीद्वारे दहशत निर्माण करीत असल्याने जळगाव शहर पोलिसांना संबंधितांना हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव तयार करून तो जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठवला होता. प्रस्तावाची छन्नी होऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोघांना जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले. असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी दिली.