महाराष्ट्राला सुपरिचित असलेले होमिओपॅथिक डॉ.अर्जुन अशोकराव लोणारी यांना नुकत्याच झालेल्या 2023 शरीरसौष्ठव स्पर्धेत ब्राँझ मेडल प्राप्त
सचिन वखारे:-
डॉ.अर्जुन अशोक लोणारी यांना ” मनमाड क्लासिक ” या शरीरसौष्ठव स्पर्धेत ब्राँझ मेडल*.
येवला येथील संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले होमिओपॅथिक डॉ.अर्जुन अशोकराव लोणारी यांना नुकत्याच झालेल्या 2023 शरीरसौष्ठव स्पर्धेत ब्राँझ मेडल प्राप्त झाले आहे.या स्पर्धा मनमाड येथे आयोजित केल्या होत्या.श्री. अर्जुन लोणारी यांची या अगोदरही मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून लुधियाना (पंजाब) येथे झालेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निवड झाली होती,तसेच 2022 मध्ये मुंबई येथे झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत मास्टर गटात त्यांना तिसरा क्रमांक मिळून त्यांची पाँडिचेरी येथे झालेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत निवड झाली होती,तसेच नाशिक येथील ” हबीब क्लासिक” य स्पर्धेत त्यांना सिल्व्हर मेडल प्राप्त झाले होते.याशिवाय 17 नोव्हेंबर 2022 ला आत्मामालिक, कोकमठान येथे झालेल्या राज्यस्तरीय मास्टर कुस्ती स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकाउन त्यांची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यांनी वयाच्या पन्नाशीत प्राप्त केलेले हे सर्व सन्मान महाराष्ट्रातील मराठी मातीसाठी,मराठी माणसांसाठी,मराठी विचारांसाठी गौरवास्पद आहेत,गौरवाची गोष्ट ही आहे की ते शुद्ध शाकाहारी आहेत. शाकाहारात काय ताकद असते हे त्यांनी या सन्मानांतून सिद्ध केले आहे.ते व्यवसायाने डॉ. असले तरी त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या अण्णांनी ( वडिलांनी) व्यायामाचे मार्गदर्शन करून व्यायामाची आवड निर्माण केली होती. वडिलांनी लहानपणीच केलेले व्यायामाचे संस्कार त्यांनी जतन केले व विकसित केले म्हणूनच त्यांना हे यश प्राप्त झाले,असेही ते सांगतात. ते व्यवसायाने डॉ. आहेत.व्यायामातच खरे निरोगी शरीर दडलेले असते.निरोगी शरीरात स्वस्थ मन घर करते हे त्यांनी त्यांच्या कृतियुक्त अभ्यासातून व साधनेतून दाखऊन दिले आहे. डॉ.लोणारी यांची केवळ हीच ओळख नाही.त्यांचे अध्यात्मिक कार्य भरीव आहे.माणूस श्रीमद् भगवद्गगीतेच्या तत्वज्ञानातून व पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय विचारातून भक्कमपणे उभा रहावा.माणसाला मानसिक बळ मिळावे.आयुष्यात कोणतेही संकट आले तरी डगमगून न जाता खंबीरपणे उभे राहून मार्ग काढावा हे आत्मिक बळ देण्याचे अध्यात्मिक कार्य गावागावात व घराघरात जाऊन डॉ. अर्जुन लोणारी आजही अविरतपणे करतात.या कार्यासाठी त्यांचा दिवस पहाटे पाचला उगवतो आणि रात्री अकराला मावळतो.माणूस भक्कमपणे उभा रहावा हीच त्यांची तळमळ आहे. त्यांना प्राप्त झालेल्या या सन्मानाबद्धल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.