एमपीडीए कायद्याखाली समीर काकर नागपूर कारागृहात रवानगी
एमपीडीए कायद्याखाली समीर काकर नागपूर कारागृहात रवानगी
प्रतिनिधी शाहिद खान
एमपीडीए कायद्याखाली जळगाव शहरात तांबापुरा परिसरातील समीर हनीफ काकर या तरुणास्थान बद्ध करण्यात आले आहे. समीर काकर याचे विरुद्ध खुनाचा प्रयत्न या कलमाखाली एक गंभीर दुखापात करणे या कलमाखाली एक गर्दीसह दुखापत या कलमाखाली एक सरकारी नोकरावर हल्ला या कलमाखाली एक आणि घरफोडीचे असे ११ गुन्हे दाखल आहेत.
जळगाव शहर रामनंद नगर आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन अशा तिन पोलीस स्टेशनला मिळुन त्याच्याविरुद्ध एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पो.नि जयपाल हिरे, व पो.नि शंकर शेळके यांच्यासह सहायक फौजदार युनूस शेख, हे.कॉ नितीन पाटील, सचिन पाटील, इमरान सैय्यद, इम्रान बॅग, आदींनी कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील समीर काकर याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.