श्रीरामनवमी उत्सव यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सर्वानुमताने श्री दिपक सोपानराव वारुळे यांची निवड ! अनेक वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदा बहुजन समाजाला मिळाला मान !! 🚩 राजेंद्र भुजबळ शिर्डीमध्ये साईबाबांच्या
श्रीरामनवमी उत्सव यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सर्वानुमताने श्री दिपक सोपानराव वारुळे यांची निवड ! अनेक वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदा बहुजन समाजाला मिळाला मान !! 🚩 राजेंद्र भुजबळ
शिर्डीमध्ये साईबाबांच्या हयातीपासून सुरू केलेल्या श्रीरामनवमी उत्सवाचे हे ११२ वे वर्ष आहे. ह्या उत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून शिर्डी गावात तीन ते चार दिवस यात्रा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. काही गैरसमजामुळे ह्या उत्सवात दोन गट पडले असून काल श्रीरामनवमी उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी श्री संजय ( आप्पा ) शिंदे यांची निवड झाली आहे तर आज हजारो सर्व जातीधर्माच्या जेष्ठ व तरुण कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्री दिपक सोपानराव वारुळे यांची निवड झाली. ही बैठक शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते व मावळते यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मंडळी गट दोन पडले असले तरी ते सर्वप्रथम आपल्या गावचे ग्रामस्थ आहे तर एकाच कुटुंबातील आपलेच सहकारी बांधव आहेत. या दोनही गटाचा एकोपा संध्याकाळपर्यंत होऊन कुणाचेही पद न काढता एक अध्यक्ष व दुसरा कार्याध्यक्ष करून आपापसातील गैरसमज दूर होण्यासाठी हा मार्ग व निर्णय योग्य आहे असं माझं वयक्तिक मत आहे.
कमिटीमध्ये मुस्लिम बांधव दलित बांधव याच बरोबर बहुजन घटकांना संधी द्यावी ही विनंती.
शिर्डीतील सर्व पक्षातील जेष्ठ नेते अर्थात कैलाबापू कोते, अभयराजे शेळके , शिवाजीराजे गोंदकर, कमलाकर कोते, ज्ञानेश्वर आबा गोंदकर, डॉ. एकनाथ गोंदकर ,विजय जगताप, निलेशदादा कोते, सचिन शिंदे ,नितीन कोते, दादा गोंदकर, उत्तमभैय्या कोते राजाभाऊ कोते, अनिल शेजवळ, संदीप पारख, आप्पासाहेब कोते, हिरामण वारुळे, अशोक खंडू कोते देवराम सजन, हरीभाऊ बनकर, वाल्मिक गोटीस,गफ्फारभाई पठाण, ताराचंद कोते, सचिन तांबे यांसह अनेक ग्रामस्थ तरुण कार्यकर्ते यांचं फार मोठं योगदान शिर्डीच्या जडणघडणीमध्ये आहे म्हणून ह्या गावच गावपण व गावाची सुरक्षा अबाधित आहे.
शिर्डीमध्ये प्रथमच एक बहुजन समाजातील तरुणाला श्रीरामनवमी उत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्षस्थान दिल्याने गावात मोठं आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ह्या निवडीच्यावेळी केशवराव गायके, सलीम शेख,विजय पवार,शंकर त्रिभुवन, खंडू गोर्डे, जावेद शेख, समीर शेख,विक्रांत वाकचौरे, देवानंद शेजवळ,सचिन गायकवाड, नितीन धिवर,प्रकाश गोंदकर, पंडितराव शेळके,संजय जायभाय, सोमनाथ कावळे, दत्तू कोते, मनोज वाघ, सचिन औटी, गिरीधर सोनेजी, प्रसाद सुरंजे, अनुप गोंदकर, साई कोतकर यासह शेकडो कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष दिपक वारुळे यांना समर्थन देऊन त्यांचा सत्कार करून वाजतगाजत मिरवणूक काढून आपले ग्रामदैवत मारुती मंदिरात जाऊन आरती केली व साईसमाधीचे दर्शन घेतले व नंतर शिर्डीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते व माजी उप सरपंच श्री भीमाशंकर मुरलीधर सोनवणे यांची प्रतिमा शिर्डी नगरपरिषदेच्या दालनात मोठ्या सन्मानाने लावण्यात आली व सदर कार्यक्रमाची आनंदात सांगता पार पडली.