एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा.
एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा.
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये लेखक,कवी वि. वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ मराठी शिक्षिका शर्मिला पवार या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला व सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदनाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.यानंतर स्कुलच्या मराठी शिक्षिका सुस्मिता देशमुख,प्रिंसिपल अल्ताफ खान यांनी मराठी भाषेबद्दल आपले मनोगत व्यक्त केली.अध्यक्षीय भाषणात शर्मिला पवार यांनी कुसुमाग्रज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला व मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी दीपक खैरनार,प्रशांत बिवाल,अमजद अंसारी,गौरव सैंदाने, मनीष सैंदाने, अजीम पटेल,सचिन घोडके,स्मिता खैरनार,आरती राजपूत,पूजा गायकवाड, शुभांगी दांरुटे, राजश्री झांबरे, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, चेतना माकुने, सुनीता वडे आदि उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी तर आभार प्रदर्शन अमोल आहेर यांनी केले.