खोची येथे भैरवनाथ मंदिरात एक लाख कालभैरव अष्टक स्त्रोताचे पठण उत्साहात
खोची येथे भैरवनाथ मंदिरात एक लाख कालभैरव अष्टक स्त्रोताचे पठण उत्साहात .
प्रतिनिधी: रोहित डवरी हातकलंगले पेठवडगाव
महाराष्ट्र कर्नाटक यासारख्या अनेक राज्याचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खोची येथील श्री भैरवनाथ मंदिरात मंदिरात २४ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या कालभैरव अष्टक स्त्रोताचे एकत्रित पठण हा संकल्प पुर्ण झाला.यामध्ये इष्ट देवतांना आवाहन केले होते. ह्या संकल्पनेचा हेतू मानवी समाज सुखात, आनंदात, व निरोगी राहावा या भावनेने केलेला हा संकल्प पूर्ण झाला.हा संकल्प प्रथमच साजरा केल्यामुळे भक्तांच्या मध्ये एक प्रचंड उत्साह जाणवतं होता विशेषतः महिलांचा सहभाग जास्त होता. या सोहळ्यामध्ये खोचीसह परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. एकूण महिला व पुरुष 350 लोकांचा सहभाग होता. सामुदायिक कालभैरव अष्टक स्त्रोत पटनाची संकल्प भैरवनाथ मंदिर समितीने केले होते यामध्ये विशेषता मंदिराचे पुजारी सालकरी संभाजी गुरव धनाजी गुरव, गुरुदेव गुरव, सोनाजी गुरव ,अक्षय गुरव, अशोक बामणकर ,पिंटू डवरी ,मयूर डवरी , विजय गुरव, सुरेश गुरव, रमेश गुरव,आणि समस्त गुरव गोसावी नाथपंथी डवरी समाज व ग्रामस्थ विशेष सहकार्य गुरुदत्त भजनी मंडळ विठ्ठल भजनी मंडळ खोंची ,व्ही ए बाबर सर, जाखले सर, सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे आभार आयोजकांनी मानले.