हनुमान मंदिरात पूजेसाठी गेलेल्या महिलेची मोटरसायकलवर आलेल्या चोरट्याने सोन्याची पोत नेली ओरबडून*
*हनुमान मंदिरात पूजेसाठी गेलेल्या महिलेची मोटरसायकलवर आलेल्या चोरट्याने सोन्याची पोत नेली ओरबडून*
पोलीस टाईम्स न्यूज/ सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवड* : देवदर्शन व मंदिरातील साफसफाई साठी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत मंदिरातून चोरून नेण्याची घटना आज चांदवड येथील डावखर नगर येथील हनुमान मंदिरात घडली आहे
डावखर नगर येथील रहिवासी सौ सुनीता दीपक हांडगे या नेहमीप्रमाणे हनुमान मंदिरात देवदर्शनासाठी गेल्या असता त्या ठिकाणी मोटरसायकलवर दोन अज्ञात युवक येऊन मंदिरातूनच त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची पोत ओरबडून घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले.
सदर घटनेने चांदवड शहर शहरातील महिलावर्ग घाबरलेल्या स्थितीत असल्याने सदर साखळी चोरांचा पोलिसांनी शोध लावण्याची मागणी जनतेतून होत आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये मोटरसायकल वर पळून जाणारे दोघे दिसत असून चांदवड पोलीस स्टेशन सदर गुन्ह्याचा तपास करत आहेत
सदर गुन्हा चांदवड पोलीस स्टेशन येथे दाखल असून त्याचा तपास चांदवड पोलीस स्टेशनच्या पोलीस नाईक कमल अहिरे करत आहेत