भुसावळ तालुका कन्हाळा सव्वा लाखांचे गावठी दारूचे रसायन नष्ट
भुसावळ तालुका कन्हाळा सव्वा लाखांचे गावठी दारूचे रसायन नष्ट
प्रतिनिधी शाहिद खान
भुसावळ तालुक्यातील शिरपूर – कन्हाळा गावाजवळील नाल्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारूच्या भट्ट्या सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर गुरुवारी पहाटे पथकाने तीन ठिकाणी छापेमारी करीत सुमारे सव्वा लाखांचे गावठीचे रसायन नष्ट करीत तिघांना अटक करीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला या कारवाईने अवैध्यरीत्य दारू गाळणाऱ्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. अधिक माहिती अशी की, शिरपूर कान्हाळा गावाच्या नाल्या खाली गावठी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईची आदेश दिल्यानंतर गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास यासीन सत्तार पिंजारी, रमण सुरळकर, संकेत झांबरे, तसेच आरसीपीचे सागर गायकवाड, संदीप भटु सोनवणे, गोपाळ पाटील, सोमनाथ आगवणे, ललित जाधव आदींच्या पथकाने धाव घेत छापेमारी केली. यावेळी संशयित चुल्यावर हातभट्टी चे रसायन तयार करीत असल्याचे दिसून आल्यानंतर पथकाने जुम्मा पीरू गवळी, (वय-४०) युनूस हसन गवळी, (वय-३८) सुभान तुकडु गवळी, (वय-४५) सर्व रा. शिरपूर कान्हाळा यांना ताब्यात घेतलेले त्यांच्याकडे तीन हजार ६०० लिटर गुळ, मोह, नवसागर मिश्रित कच्चे रसायन जागीच नष्ट केले तसेच ८ हजार शंभर रुपये किमतीचे ३५ लिटर तयार गावठी दारू मिळून असा एक लाख १६ हजार रुपयांचे रसायन जागीत नष्ट करण्यात आले. तिघांना विरोधात भुसावळ तालुका पोलीस आत नाही की यासीन सत्तार पिंजरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.