चिंचोली येथे जुन्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये हाणामारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चिंचोली येथे जुन्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये हाणामारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे मागील वादातून दोन कुटुंबामध्ये लाट्या काठ्या व लोखंडी रॉडने हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारीवरून ७ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे संतोष भगवान लाड हे पत्नी व मुलास वास्तव्यास आहेत. संतोष लाड यांच्या मुलगा ओम याच्या पाण्याच्या डब्बा सांडल्याच्या कारणावरून गावातीलच धनराज मुकुंदा घुगे याच्याशी वाद झाला. या वादातून धनराज यांच्यासह आशुतोष मुकुंदा घुगे, गणेश मुकुंदा घुगे हे तिघे भावंड २२ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास संतोष लाड यांच्याघरी आले. यादरम्यान लाठ्या काट्यांनी तसेच लोखंडी रॉडने तिघांना घरात घुसून संतोष लाड व त्यांच्या मुलगा ओम लाड व पत्नी सुनीता लाड यांना बेदम मारहाण केली. यात पती पत्नी व मुलगा तिघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी संतोष लाड यांच्या तक्रारीवरून गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास आशुतोष मुकुंदा घुगे, व गणेश मुकुंदा घुगे, आणि धनराज मुकुंदा घुगे, या तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान याच वादातून ऋषिकेश मुकुंदा घुगे या तरुणाने तक्रार केली आहे. धानवड रस्त्यावर ऋषिकेश हा त्याच्या मित्र गौरव सोबत बाथरूमला गेले. यादरम्यान ओम संतोष लाड, सचिन मधुकर वाघ, व प्रणव विनोद लाड, या तिघांनी ऋषिकेश या शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर निर्मलाबाईसह ओम सचिन व प्रणव या तिघांनी ऋषिकेश याच आईला लोखंडी पाईपने मारून दुखापत केली. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून ओम संतोष लाड, सचिन मधुकर वाघ, प्रणव विनोद लाड, व निर्मलाबाई लाड, सर्व रा. चिंचोली जळगाव या चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या दोन्ही घटनांचा तपास पो.हे.कॉ गफुर तडवी हे करीत आहेत.