चिंचखेड येथे सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव साजरा…
चिंचखेड येथे सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव साजरा…
मनोहर देसले [पोलीस टाईम्स न्यूज प्रतिनिधी] पिंपळगाव बसवंत
शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा जि प शाळा चिंचखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली…. या मंगल प्रसंगी शिव प्रतिमा पूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले…लेझीमनृत्य,विद्यार्थी भाषणे,जि प अध्यक्ष चषक स्पर्धेत वैयक्तिक नृत्य प्रकारात द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार यांसह राज्य शासनाच्या निर्देशांनुसार राज्यगीत *जय जय महाराष्ट्र माझा* या गीताचे गायन करण्यात आले…
याप्रसंगी शिक्षणप्रेमी नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाब्बासकी बरोबरच रोख बक्षिससुध्दा दिले त्यात श्री अनिल बाळासाहेब शिंदे यांनी भाषणांसाठी 5100/ रुपये शाळेतील सर्व कार्यक्रमासाठी बागायतदार चहा गृपतर्फे 2100/रुपये लेझीमनृत्यासाठी कादवा कारखान्याचे माजी संचालक श्री त्र्यंबकराव संधान सर 500/उपसरपंच सौ ज्योती दत्तात्रेय संधान 500/ रुपये मुंबईहुन आलेले पाहुणे दिलीप किवेकर 500/रुपये बक्षीस देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविल्याबद्दल मुख्याध्यापक श्री संजय चौधरी यांनी देणगीदार,पालक शिक्षणप्रेमी नागरिक ग्रामस्थ व शिवजयंती उत्सव समिती,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत चिंचखेड सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच चिंचखेड माध्यमिक विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत चौधरी सर ज्येष्ठ शिक्षक मातेरे सर देशमाने सर यांनी शिवजन्म विषय बद्दल सांगितले विद्यार्थ्यांचेही भाषणे झाले