ताज्या घडामोडी

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अंदरसूल येथील गोबरधन प्रकल्पाची पाहणी

*माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अंदरसूल येथील गोबरधन प्रकल्पाची पाहणी*

*येवला,दि.२१ फेब्रुवारी :-* स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने अंदरसुल येथे गोबरधन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत येवला तालुक्यातील अंदरसूल येथे सुरु असलेल्या कामाची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली.

यावेळी गटविकास अधिकारी अन्सार शेख, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे,महेंद्र काले,मकरंद सोनवणे,सचिन कळमकर सरपंच अश्विनी खैरनार, किशोर बागुल, प्रकाश वाघ, झुंजारराव देशमुख, मारूती वाघचौरे, शिवाजी वडाळकर, उज्वल जाधव सुदाम सोनवणे, अमोल सोनवणे, संजय ढोले, सुनील सोनवणे,कचरू गवळी,सुभाष गांगुर्डे,सचिन सोनवणे, गणेश गवळी, प्रकाश बागल यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यात अंदरसुल येथे होत असलेला गोबरधन प्रकल्प हा जिल्ह्यातील पहिलाच प्रकल्प आहे. यासाठी शासनाकडून ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत प्रामुख्याने शेती कचरा, सेंद्रिय कचरा, गुरांचा कचरा, गोशाळेपासून घरगुती वापर गॅसची निर्मिती करण्यात येणार आहे. या गॅसचा वापर गावातील कुटुंब, शाळा, अंगणवाडीत करण्यात येणार आहे. स्लरीचा उपयोग शेतीसाठी खत म्हणून करण्यात येणार आहे. जनावरांची संख्या, लोकसंख्या, शेतीत निर्माण होणारा कचरा या निकषावर या प्रकल्पासाठी अंदरसूल गावाची निवड करण्यात आली.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी गुरांचा कचरा, स्वयंपाकघरातील कचरा, पिकांचे अवशेष आणि बाजारातील कचऱ्यासह जैव कचऱ्याचे रूपांतर करून गाव स्वच्छतेसाठी गोबरधन योजना राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आणि कुटुंबांना आर्थिक आणि संसाधन फायदे देण्याचे उद्दिष्ट आहे. खेड्यांत चांगली स्वच्छता आणि आरोग्य याद्वारे या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना होणार आहे.

गोबरधन योजनेचे उद्दिष्ट घनकचरा व्यवस्थापन, ग्रामीण भागातील जनतेचे उत्पन्न व रोजगार वाढविणे आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. गावातील कचरा कमी करून, गावाच्या स्वच्छतेचा स्तर उंचावणे, सेंद्रिय खतापासून बायोगॅस प्रकल्पातील शिल्लक स्लरीचा उच्च दर्जाचे खत रासायनिक खताला पर्याय उपलब्ध करून देणे, साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून, मलेरिया व अस्वच्छतेपासून निर्माण होणाऱ्या रोगांचे निर्मूलन करणे, स्वयंपाकासाठी स्वच्छ व स्वस्त बायोगॅस पुरवठा करणे हे आहे.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!