डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगांव जि. कोल्हापूर येथील शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रमुख मागण्या करता केले आंदोलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगांव जि. कोल्हापूर येथील शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रमुख मागण्या करता केले आंदोलन.
प्रतिनिधी: रोहित डवरी, पेठ वडगाव
महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्यांच्या पुर्तेतेसाठी राज्याव्यापी आंदोलन सोमवार दि. 20.02.2023 पासून बेमुदत काम बंद आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, पेठ वडगांव जि. कोल्हापूर येथील शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राज्यशासनाकडे असणाऱ्या मागण्या
1) जुनी पेन्शन योजना लागू करावी
2) शिक्षकेत्तर कर्मचारी भरती करावी
3) सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना
4) 58 महिन्याची थकबाकी
5)1410 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे इत्यादी मागण्या पूर्ण होणे करिता तसेच इयत्ता 12 वी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकून काम बंद आंदोलनकेले आहे. उपस्थित कर्मचारी श्री. किरण पोवार, ज्ञानेश्वर बुरकुले, नंदकुमार कांबळे, सागर कुंभार, प्रकाश कोरे, राहुल कांबळे, राकेश साळुंखे, राजू शिंदे, अजय झाकर्डे, स्वाती गनबावले सर्व बेमुदतीत काम बंद आंदोलनात सहभागी झाले.