उडाली एम.एस.जी.एस.ची पाखरे….*

प्रतिनिधी :- सचीन वखारे,येवला
*उडाली एम.एस.जी.एस.ची पाखरे….*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दि. १७ फेब्रुवारी रोजी इ.१०वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बेजॉन देसाई फाऊंडेशनचे सी.ई.ओ. तसेच जयम फाउंडेशन नाशिकचे संचालक डॉ.अश्विनीकुमार भारद्वाज हे होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण भांडगे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन तसेच शिक्षण व सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. विद्यार्थीनींनी पाहुण्यांचे स्वागत केले तसेच अझहर खतीब रचीत “तू कल चला जायेंगा तो मे क्या करुंगा” गाणे सादर केले. पाहुण्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.विद्यार्थ्यांनी इ.नर्सरी ते १०वी तील सर्व शिक्षकांचे सत्कार केले. इ.१०वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी लाऊडस्पिकर व ऑटोमॅटिक साऊंड सिस्टीम संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, सरचिटणीस अमोल सोनवणे व खजिनदार मकरंद सोनवणे यांना सुपूर्द केले.तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या इ.१०तील विद्यार्थ्यांनी शाळेस मोठ्या २ समई भेट दिल्या.
विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात आपले शाळेतील इ.के.जी. ते १०वी चा अनुभव सांगितला, शिक्षकांनी घेतलेले परिश्रम बद्दल माहिती दिली, प्रिन्सिपल व शिक्षकांनी केलेले मार्गदर्शनाच्या आभार मानले. आपले शब्द व्यक्त करतांना विद्यार्थी व शिक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले व सर्व विद्यार्थ्यांना शाळा सोडून जाण्याचे दुःख व्यक्त केले. प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी विद्यार्थ्यांना पेपर कसे लिहावे, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन केले.यानंतर इ.९वी च्या विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थी व स्टाफ साठी भोजनाची व्यवस्था केली होती. कार्यक्रमासाठी इ.१०वीच्या जानवी सोनवणे, स्मिता देशमुख सह सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. डॉ.अश्विनीकुमार भारद्वाज यांनी विद्यार्थ्यांना शाळेचे महत्त्व व अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सरचिटणीस व संस्थेच्या सर्व संचालक मंडळांनी केलेल्या परिश्रम व पुरवलेल्या सुविधांची आठवण करून दिली. अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच कार्यक्रमासाठी अरुण भांडगे, मकरंद सोनवणे, अमोल सोनवणे, अजयसिंगजी, रामनाथ काका एंडाईत, राघू जाधव, कचरू गवळी, भगीनाथ थोरात, द्वारकानाथ सोनवणे, ज्यू.कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमी इंग्लिशच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, इंग्लिश मिडीयमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, अझहर खतीब, दीपक खैरनार, प्रशांत बिवाल, अजीम पटेल, गौरव सेंदाने, मनीष सेंदाने, गणेश सोनवणे, सचिन घोडके, माधुरी माळी, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, सुश्मिता देशमुख, शर्मिला पवार, सुनीता वडे, शोभा निकम, आलिया खान, अपर्णा लक्कडकोट सह इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिती खैरनार, स्नेहल वडाळकर, दिव्या सोनवणे, पायल एंडाईत, विनायक खैरनार सह शिक्षिका चेतना माकूने यांनी केले तर आभार अझहर खतीब यांनी मानले.