महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या नेचर क्लब च्या वतीने चंद्रेश्वरगड येथे स्वच्छता अभियान.

*एस.एन.जे.बी. जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या नेचर क्लब च्या वतीने चंद्रेश्वरगड येथे स्वच्छता अभियान…*
पोलीस टाईम्स न्यूज /सुनिलआण्णा सोनवणे
*आमदार डॉ राहुल आहेर यांनी केले विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक….*
*चांदवड:* श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड येथे महाशिवरात्री यात्रा निमित्त गडाच्या स्वच्छतेची मोहिम आज रोजी एस. एन. जे. बी. जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या *नेचर क्लब* च्या वतीने सकाळ पासूनच स्वच्छता मोहिम सुरू होती. दरम्यान एका कार्यक्रमा निमित्त चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार याठिकाणी आले असता , आमदारांनी विद्यार्थी व त्यांचे प्रमुख सुमित पवार यांना शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले.
यावेळी साक्षी दुग्धे, यश सोनार , निरंजन पाटील , प्रसाद कुलकर्णी , स्नेहीत पवार , अभिषेक बावा , विवेक पवार , कोमल पवार , कोमल सातपुते , श्रद्धा अनर्थे , जयश्री गोसावी , महिमा पवार , वैभवी जाधव , दिक्षा पगारे , पूजा सोनवणे आदि विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.
यावेळी स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. व प्राचार्य डी. एम. कोकाटे यांनी शुभेच्फछा दिल्या. या स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व आस्थापना विभागाचे सुमित पवार यांनी केले. श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या वतीने संजय पाडवी यांनी सर्वांचे आभार मानले.