वारली चित्रकार मनिषा बोरसे यांची विश्वविक्रमी शिव चरित्र रेखाटने.

वारली चित्रकार मनिषा बोरसे यांची विश्वविक्रमी शिव चरित्र रेखाटने.
प्रतिनिधी इंदिरानगर – येथील सुखदेव प्राथमिक मराठी विदयामंदिर शाळेतील उपशिक्षिका मनिषा बोरसे-पाटील यांनी दी. १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन १९ लघु वारली चित्र काढून विश्वविक्रमात नोंद केली. असुन मनिषा बोरसे-पाटील यांना या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र व मेडल माजी खासदार तसेच स्वराज्य संघटना प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या वारली चित्रात शिवरायांचे बालपण ते राज्याभिषेका पर्यंतचे महत्वाचे १९ प्रसंग वारली चित्रशैलीत प्रत्येकी ४ बाय ४ सेंटीमीटर इतक्या लहान कागदावर त्यांनी रेखाटन केले आहे. यातआरमार स्थापना व राज्याभिषेक सोहळा इत्यादी घटनांची चित्रे समाविष्ट आहेत.वल्द वाईड बुक ॲाफ रेकॅार्ड मध्ये लघु वारली चित्र या मथळ्याखाली सदर विक्रमाची नोंद झाली आहे. या वेळी आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे, स्वराज्य संघटना प्रवक्ता करण गायकर आदी. मान्यवर उपस्तित होते. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी सदर विश्वविक्रमाची सविस्तर माहिती जाणुन घेऊन मनिषा बोरसे यांचे कौतुक केले.उपशिक्षिका मनिषा बोरसे यांच्या या विश्वविक्रमी यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा रत्नाबाई काळे,सरचिटणीस संजय काळे,मुख्याध्यापक नितीन पाटील व प्राचार्य बाबासाहेब खरोटे यांनी आभिनंदन करून कौतुक केले. आमदार कोट – प्राचीन आदिवासी वारली चित्रशैलीचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणुन गेली १० वर्ष वेगवेगळया शाळेत मोफत वारली चित्रशैली कार्यशाळा घेत असतांना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली कि आदिवासी बांधव त्यांचे सण,उत्सव व देवतांना आपल्या विशिष्ट चित्र शैलीत रेखाटत असतात.अठरापगड जातीतील लहान लहान घटकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिवन परिचय शिवजयंती निमित्त १९ लघु वारली चित्रात रेखाटण्याचा एक प्रयत्न केला आणी त्याची जागतिक स्तरावर विश्वविक्रम म्हणुन नोंद झाल्या अत्यानंद होत आहे.छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे यांच्या हस्ते झालेला सन्मान नक्कीच आनंद व्दिगुण्त करणार ठरला…
मनिषा बोरसे- पाटील उपशिक्षिका सुखदेव प्राथमिक मराठी विदयामंदिर,नाशिक