चांदवड पोलीस स्टेशनच्या पथकाने चिंचवे शिवारात झाडाझुडपात डोंगराच्या पायथ्याशी असलेला गावठी हातभट्टीचा दारूचा अड्डा केला उध्वस्त*
*चांदवड पोलीस स्टेशनच्या पथकाने चिंचवे शिवारात झाडाझुडपात डोंगराच्या पायथ्याशी असलेला गावठी हातभट्टीचा दारूचा अड्डा केला उध्वस्त*
पोलिस टाईम्स न्यूज/सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवड/देवळा:* दुपारी चार वाजेच्या सुमारास चिंचवे शिवारात वाघदर नाल्यात आठ प्लास्टिकच्या निळ्या रंगाचे प्रत्येकी 50 लिटरचे रसायन असलेले एकूण 400 लिटर आंबट उग्र वासाचे कच्चे रसायन अंदाजे किंमत आठ हजार रुपयांचे यातील अज्ञात आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी प्लास्टिक ड्रम मध्ये रसायन तयार केले असून मुंबई प्रोव्हिजनल अॅक्ट ६५(ई) प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरोधात चांदवड पोलीस स्टेशनचे पो. कॉ. 2910 चंद्रकांत अरुण पवार यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नाशिक ग्रामीण मध्ये अवैध व्यवसायांच्या कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक शहाजी उमप नाशिक ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई चालू असून चांदवड पोलीस स्टेशनचे पथक देवळा तालुक्यातील चिंचवे शिवारात वाघदर नाल्याजवळ जाऊन कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांचे समवेत पो. हवा. डोंगरे, पो. हवा. अहिरे, पो. कॉ. प्रदीपसिंग सोळंकी, पो. कॉ. चंद्रकांत पवार यांच्या पथकाने सदर गावठी अवैध दारू भट्ट्या व दारूचा नाश करण्यात आला. सदर ठिकाणी आरोपी हे फरार असून अज्ञाताविरुद्ध देवळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.