ताज्या घडामोडी

आत्मा मालिक इंग्लीश मिडीयम गुरुकुल येवला येथे मातृ-पितृ दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला

*मातृ-पितृ देव भव*
आत्मा मालिक इंग्लीश मिडीयम गुरुकुल येवला येथे मातृ-पितृ दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक गुरुकलाचे मा.अध्यक्ष विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस मा.श्री हनुमंतरावजी भोंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून येवला गुरुकुलामध्ये मातृ पितृ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे स.पालक श्री गणेश पावटेकर व श्रीमती प्रिया पावटेकर तसेच श्री शिवाजी भोरकडे व श्रीमती चित्रा भोरकडे , संत चरणदासजी महाराज यांना आमंत्रित करण्यात आले होते.मान्यवरांच्या व प्राचार्य कापसे सरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी कु.परिणीती पावटेकर व कु. सुयश भोरकडे या विद्यार्थ्यांनी आपापल्या आई-वडिलांचे पूजन करून सर्व विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श निर्माण केला.
पावटेकर व भोरकडे पालकांनी विद्यार्थ्यांना मातृ-पितृ दिनाच्या शुभेच्छा देऊन आई-वडिलांची सेवा कशी करायची याची माहिती दिली व सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.तसेच संत चरणदासजी महाराज प्राचार्य कापसे सर व सौ कुमकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.इ.आठवीची विद्यार्थिनी कु.श्रावणी वरोडे हिने “हंबरूनी वासराले” ही कविता सादर केली.इ. आठवीचा विद्यार्थी कु.पार्थ महाजन यानी मातृ-पितृ पूजनावेळी श्री सूक्त पठण केले.ट्
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. हेडगिरे मॅडम व सौ.जोरी मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीर प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR..AFAZAL Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!