ताज्या घडामोडी
श्री गजानन महाराज प्रकट दिन निमित्ताने शहरातील श्री सुंदरराम मंदिर येथे श्री गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने तीन दिवसीय श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संगीता सबनीस यांनी व्यासपीठावरून श्री गजानन विजय ग्रंथातील २१ अध्यायांचे वाचन केले. ग्रंथ वाचन पारायणासाठी मोठ्या संख्येने महिला पुरुष भाविकानी आपला सहभाग नोंदवला. प्रकटदिनाचे दिवशी गजानन महाराजांच्या प्रतिमेचे पोडोशोपचार पूजन
करण्यात आले. पारायण सोहळा समाप्तीनंतर महाआरती करण्यात येऊन गण गण गणांत बोते चा गजर करत समारोप करण्यात आला यावेळी उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला…
याकामी श्री गजानन महाराज भक्त परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
साठी सचिन वखारे येवला.