मजले ग्रामपंचायतीची जोमाने कामाला सुरवात
मजले ग्रामपंचायतीची जोमाने कामाला सुरवात
हातकणंगले प्रतिनिधी.संतोष कोठावळे
मजले.तालुका हात.जी.कोल्हापूर येथील नूतन सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी जोमाने कामाला सुरुवात केली आहे मजले गावाला गेली 2 वर्षे पाणीपुरवठा बंद होता त्यामुळे गावातील ग्रामस्थांचे अतोनात हाल होत होते हे लक्षात घेऊन ग्रामपंचायत व गावातील पार्श्वनाथ पाणी पुरवठा,विद्यासागर पाणी पुरवठा संस्था व गावातील तरुण व जाणकार मंडळी यांनी एकत्र येऊन पाणीपुरवठा संस्था मार्फत गावाला पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या मधे समाधानाचे वातावरण आहे ग्रामस्थ यामुळे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्य या सर्वांचे कौतुक होत आहे असेच लोकोपयोगी करू इथून पुढे होत राहो अशी अपेक्षा ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे यावेळी सरपंच मधुमती पाटील,उपसरपंच,बाबसो पाटील,सदस्य बाळासाहेब गायकवाड, आनंदा सनदी, अरूणा कोठावळे, पारीसा पाटील,अविनाश पाटील,मजले गावच्या पोलिस पाटील , अभिजित पाटील भमना ज्येष्ठ नागरिक शांतीनाथ पाटील इ ग्रामस्थ उपस्थित होते