चोरीच्या दोन दुचाकींसह अटल चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात
चोरीच्या दोन दुचाकींसह अटल चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरात एमआयडीसी पोलिसांनी अटल दुचाकी चोट्याच्या मुस्क्या बांधत त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीने घरफोडीची कबुली दिली आहे. इश्तीयाक अली राजीक अली ( वय-२०) रा. तांबापुरा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, तांबापुरात साधी शब्द पटेल यांच्याकडे आरोपीने ५० हजारांची घरफोडी केली होती. २ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घोरफोडी प्रकरणी आरोपी इश्तीयाकला अटक करण्यात आल्यानंतर रोकड जप्त करून आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली मात्र आरोपीने खेडी रोड परिसरातून चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास न्यायालयाच्या परवानीने कारागृहातून ताब्यात घेत दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान आरोपीने दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपीला गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास सोमवार १३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, सैय्यद इमरान, रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, सचिन पाटील योगेश बारी, किरण पाटील मुकेश पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.