पांडेचौकात ८ लाख रुपयांचा व्यापारीच्या बॅग हिसकावून नेल्याची टोळीच्या पर्दाफाश ; एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी
पांडेचौकात ८ लाख रुपयांचा व्यापारीच्या बॅग हिसकावून नेल्याची टोळीच्या पर्दाफाश ; एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी
प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव शहरात पांडे चौकात ८ लाख रुपयांची मोटरसायकलवर जबरी चोरी करणाऱ्या पाच संशयित टोळीचा पर्दाफाश एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अधिक माहिती अशी की, दि. 23.01.2023 रोजी ईश्वर बारुणामण दाणाबाजार येथुन रात्री 09.00 वा चे सुमारास त्याचे दुकान बंद करून घरी पांडे डेअरी चौकातून रामदेवबाबा मंदीराजवळ मोटरसायकल ने जात असता दोन अज्ञात मोटरसायकल स्वारांनी मला चे कट मारला त्याचे असलेली पैशांनी त्यात 8,000,00/- रुपये रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल, हार्ड डिस्कच ईतर असा एकूण 8,52,000/- रुपये चा मुद्देमाल असलेली ही बळजबरीने हीसकावुन घेवुन गेले होते. एमआयडीसी पोलीस स्टेशनला भादवी कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
सदर गुन्हयात स्थानीक गुन्हे शाखा यांचेकडील अमलदारांनी पोटोसह यातील आरोपी शेखर निंबा पाटील वय 26 वर्षे, ममुराबाद ता जि जळगाव यास हजर केले होते. त्याचप्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हे शोध पथकाने व तपासी अधिकारी यांनी आरोपी नामे 01) लोकेश मुकुंदा महाजन वय 23 वर्षे रा. समर्थ नगर, प्लीट में 5 गट में 12 खेडी शिवार ता जि जळगाव 02) अक्षय शामसुंदर मिश्रा वय 28 वर्षे, रा. परदेशी वाडा, ममुराबाद जळगाव (03) स्वप्निल उर्फ बापू मधुकर पाटील वय 28 वर्षे, रा. साईबाबा मंदीरा जवळ, ममुराबाद जळगाव 04) खुशाल चर्फ बन्दी दिलीप तायडे वय 25 वर्षे रा. विसाजी नगर, गोलाणी मार्केट जळगाव यांची नावे निष्पन्न करून त्यांचा शोध घेत गुन्हयात अटक केले होते. मा. तालुका मैजि तथा तहसिलदार जळगाव यांचे समय आरोपी 01) लोकेश मुकुंदा महाजन वय 23 वर्षे, रा. समर्थ नगर, प्लॉट नं 5 गट नं 12 खेडी शिवार ता जि जळगाव 02) अक्षय शामसुंदर मिश्रा वय 28 वर्षे, रा. परदेशी वाडा, ममुराबाद जळगाव यांना ओळखले आहे त्यानंतर आरोपीची पोलीस कस्टडी रीमांड घेण्यात आली होती पो.क. रीमांड मध्ये गेल्या मालापैकि 4,93,000/- रुपये रोख रक्कम, आरोपींनी गुन्हयात वापरलेली बजाज कंपनीची पल्सर मो मा आणी अक्टीवा मोटरसायकल जप्त केली आहे. एकुण 6,03,000/- रुपये चा एकूण मुद्देनाल आरोपांकडुन जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी लोकेश मुकुदा महाजन, याचेवर मालाविरुध्दचे 07 गुन्हे दाखल असून आरोपी खुशाल उर्फ बंटी दिलीप तायडे याचे वर दोन शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीनी सदरचा गुन्हा नियोजनबध्द कट कारस्थान रचुन केलेला असुन यातील आरोपी शेखर निंबा पाटील हा दुकानात काम करणारा आहे.
(सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री एम राजकुमार, सो, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत गवळी सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत, मा. पोलीस निरीक्षक श्री किसन नजनराव पाटील स्थानीक गुन्हे शाखा जळगाव, मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी अमोल मोरे, पोउनी आनंदसिंग पाटील, सफो, अतुल वंजारी, पोहेका विजय पाटील, गणेश शिरसाळे, पोना, किशोर पाटील, योगेश बारी, इमरान सैय्यद, सुधीर साबळे, विकास सातदीये, पोका, छगन तायडे, मुकेश पाटील, किरण पाटील, राहुल रगडे, चालक इम्तीयाज अली खान महीला अमलदार सपला येगुटला, अशांनी केला असुन पुढील तपास पोउनी आनंदसिंग पाटील हे करीत आहेत.