*श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजातर्फे, डोंबिवली येथे उपवर – वधु व पालक मेळाव्याचे आयोजन*
*श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजातर्फे, डोंबिवली येथे उपवर – वधु व पालक मेळाव्याचे आयोजन*
*सुहास पांचाळ*ं
डोंबिवली / दि. १० : श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज, डोंबिवली यांच्या मार्फत उपवर – वधु व पालक मेळाव्याचे आयोजन रविवार, दि. २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी दु. २.०० ते सायं.६.०० वाजेपर्यंत स्व.आनंदजी दिघे सभागृह, गांधी नगर, डोंबिवली (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला आहे .
सध्या मुला-मुलींच्या विवाहाचा प्रश्न मोठया प्रमाणात गंभीर विषय झाला आहे. त्याची चिंता प्रत्येक पालकाला भेडसावत आहे. सर्वसाधारपणे असे मानण्यात येते की, परमेश्वर लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधत असतो; परंतु मुला-मुलींचा प्रत्यक्ष जोडीदार कोण आहे हे शोधणे मात्र कठीण असते. याची कल्पना आपणांस असतेच. योग्य वधु – वर शोधण्यासाठी श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाने आजपर्यंत पालकांना मदत करण्यसाठी खारीचा वाटा उचलला आहे. यांच दृष्टिकोनातून संस्थेतर्फे उपवर -वधु व पालक मेळावा आयोजित करण्याचे आयोजिले आहे.
या मेळाव्यासाठी उपवर -वधु सह पालक (आई – वडील) अशा तीन व्यक्तींनाच हजर राहता येईल. यासाठी त्यांनी दिलेल्या नोंदणी पत्रकात आपली संपूर्ण माहिती, छायाचित्र जोडून सोबत नोंदणी शुल्क रु. ५००/-असेल.
तरी या उपवर – वधु व पालक मेळाव्याचा लाभ सर्व ज्ञाती- बांधवांनी अशी विनंती श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज, डोंबिवली संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद सुतार – ९८६९८०७७२९ व उपाध्यक्ष श्री विजय सुतार – ७०४५५९५९५३ , सचिव श्री विठ्ठल मेस्त्री, खजिनदार श्री प्रणय मेस्त्री, महिला मंडळ अध्यक्ष सौ. स्मिता नवलकर यांनी केली आहे.