वाहतूक शाखेने पकडला ६० लाख २६ हजार रुपये किंमतीचा गुटख्याचा आयशर ट्रक
चाळीसगाव वाहतूक शाखेने पकडला ६० लाख २६ हजार रुपये किंमतीचा गुटख्याचा आयशर ट्रक
प्रतिनिधी शाहिद खान
चाळीसगावा: चाळीसगावातील वाहतूक पोलिसांनी पुन्हा आपल्या सतर्कतेचा प्रत्येक दिला असून राजस्थान मधून नाशिककडे होणारी गुटख्याची तस्करी रोखत तब्बल ७० लाखांचा गुटखा आयशर वाहनातून जप्त केला आहे. गुरुवारी दुपारी एक वाजता झालेल्या कारवाईप्रकरणी रात्री उशिरा हरियाणातील तिघांविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शहरातील बसस्थानक समोरन गुरुवारी दुपारी एक वाजता आयशर क्रमांक (एचआर. ७४ बी २४९०) जात असताना गस्तीवरील शाखेचे सहायक निरीक्षक तुषार देवरे, यांच्यासह नाईक नरेंद्र पाटील, नाईक दीपक पाटील, चालक हवलदार शांताराम थोरात, आदींना संशयिताला व त्यांनी वहान अडवत त्याची तपासणी केली असता त्यात ६० लाख ३६ हजार १५२ रुपये किंमतीचा प्रतिबंधित राजनिवास पान मसाला व जाफरानगी जर्दा तंबाखू, आढळल्याने ती जप्त करण्यात आली तसेच दहा लाख रुपये किंमतीच्या आयशर ट्रक असा एकूण ७० लाख २६ हजार १५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नशीब खान हुसेन खान ( वय-३४) रा. ग्राम घसेडा. ता. होडल, जि. फरीदाबाद हरियाणा) सोहेल खान मजबू खान,(वय-२१) रा. ग्राम पालमपुर ता. फरीदाबाद हरियाणा) साजिद याकूब खान, (वय-३०) रा. आलमपूर ता. जि. फरीदाबाद हरियाणा) यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे.
*यांनी* *केली* *कारवाई*
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख, चाळीसगाव शहरचे निरीक्षक के.के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे एपीआय तुषार देवरे, पो.नायक नरेंद्र पाटील दीपक पाटील, चालक शांताराम थोरात, यांच्या पथकाने केली. तपास सहा. निरीक्षक दीपक बिरारी, विनोद भोई, राहुल सोनवणे, दीपक पाटील, विनोद खैरनार, अमोल पाटील, आदी करीत आहे.