भुसावळात तरुणाने सिगारेटसाठी पैसे ना दिल्याने मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल
भुसावळात तरुणाने सिगारेटसाठी पैसे ना दिल्याने मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल
प्रतिनिधी शाहिद खान
भुसावळ सिगारेट पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकास तिघांनी बेदम मारहाण केली तसेच डोक्यावर लाकडी काठी मारून दुखापत करण्यात आली. ही घटना सोनिच्छावाडी हॉटेल मल्हार जवळ सोमवारी रात्री ११ वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरोधात मंगळवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सागर अशोक पवार (वय-२६) रा. कृष्णा नगर चैतन्य आयुर्वेदिक हॉस्पिटल भुसावळ, यांच्या तक्रारीनुसार संशयित आरोपी ने सिगारेट पिण्यासाठी सोमवारी रात्री ११ वाजता पैसे मागितले मात्र न दिल्याने राग येवुन संशयितांनी दारूच्या नशेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच डोक्यावर लाकडी काठी मारून दुखापत करण्यात आली. याप्रकरणी दादू सारवन, राहुल खरारे, वाल्मीक नगर भुसावळ, बंटी नारळवाला, भुसावळ, यांच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास हवालदार गणेश चौधरी करीत आहे.