अमळनेरात धुम स्टाईलवर चोरट्यांनी ५० हजारांचे मंगळसुत्र लांबवले
अमळनेरात धुम स्टाईलवर चोरट्यांनी ५० हजारांचे मंगळसुत्र लांबवले
प्रतिनिधी शाहिद खान
अमळनेरात धोनी स्टाईल आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ५० हजारांची मिनीपोत लांबवल्याची घटना शहरातील गुलमोहर कॉलनीत मंगळवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरातील महिलावर्गात मोठी घबराट पसरली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक माहिती अशी की, विवाहिता सुनीता गोकुळ बोरसे, (वय-४९) रा. गुलमोहर कॉलनीत अंमळनेर, याला आपल्या परिवारास वास्तव्यासह असुन मंगळवार ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजता त्या घराच्या आंगणासमोर उभ्या दुचाकीवरुन आलेल्या दोघा भांमट्यांनी काही कळण्याआत सुनिता बोरसे यांच्या गळ्यातील २० ग्राम वजनाचे व ५० हजार रुपये किमतीचे मिनीपोत हिसकावून पळ काढला. विवाहितीने ओरडाओरड करेपर्यंत चोरटे वाऱ्याच्या वेगाने पसार झाले. या प्रकरणी मंगळवारी रात्री तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करित आहे.