कुंभोज मध्ये कर्मवीर मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न होणार
कुंभोज मध्ये कर्मवीर मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न होणार
प्रतिनिधी राहुल घोलप
कर्मवीर फाउंडेशन यांच्यावतीने कर्मवीर मॅरेथॉन स्पर्धा 2023 मोठ्या दिमाखात संपन्न होणार असून या स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील तसेच गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड असलेल्या रतन प्रीती मस्के या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत खऱ्या अर्थाने कुंभोज मध्ये कर्मवीर फाउंडेशन यांच्यावतीने सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जातात 2022 पासून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी विजेत्यांना तीन लाख रुपया पर्यंतची बक्षीस देण्यात येणार आहे कर्मवीर फाउंडेशन चे अध्यक्ष माननीय सुशांत पाटील तसेच कर्मवीर चे सदस्य यांचे मौलिक सामाजिक कार्य असते नुकतेच कर्मवीर फाउंडेशन या फाउंडेशन ला एनजीओ चा दर्जा प्राप्त झाला आहे त्यामुळे होणाऱ्या स्पर्धेसाठी संपूर्ण कुंभोज परिसरातील व महाराष्ट्रातील स्पर्धक उपस्थित राहणार आहेत