ममदापुरच्या निसर्ग सानिध्यात गुडघे यांचा अभिष्टचिंतन सोहळा!!
ममदापुरच्या निसर्ग सानिध्यात गुडघे यांचा अभिष्टचिंतन सोहळा!!
ममदापुर
देविदास गुडघे पाटील यांचा वाढदिवस ममदापुर वनसंवर्धन क्षेत्रात नुकताच संपन्न झाला आहे.
येवला तालुक्यातील उत्तर -पूर्व भागात असलेल्या ममदापुर राखीव वन संवर्धन क्षेत्र पर्यटकांसाठी आकर्षण ठिकाण बनत आहे.हरीण,काळवीट, निलगाय,लांडगा,मोर. विविध पशु प्राणी आढळून येतात.दिवसेंदिवस पशु – प्राण्यांची संख्या वाढत आहे.ममदापुर राखीव वनसंवर्धन क्षेत्र वन्यजीव,पक्षी, जैवविविधता, गवती कुरण, दुर्मिळ झाडें, सेल्फी पॉईंट आदी निसर्ग सौंदर्याचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत आहे. ममदापुर राखीव वनसंवर्धन क्षेत्रात हरीण,काळवीटांच्या क्रीडा बघण्यासाठी निसर्ग प्रेमी आकर्षित होत आहे.निसर्गाची आवडत असलेले ममदापुर येथिल देविदास गुडघे पाटील यांनी 41 वा वाढदिवस ममदापुर राखीव वनसंवर्धन क्षेत्रात अमृत सरोवर या ठिकाणी.. निर्गसानिध्यात गुडघे यांचा वाढदिवस सहाय्यक वनसंवरक्षक सुजित नेवसे, वनपरीक्षेत्र अधिकारी अक्षय मेहत्रे,गोपाळ हरगावकर वनरक्षक ममदापुर यांच्या मार्गदर्शनाखाली व वनसेवक आप्पा वाघ,संवरक्षक मजूर गोरख मोरे, संवरक्षक मजूर सोमनाथ ठाकरे,संवरक्षक मजूर बबन ठाकरे, मिननाथ ठाकरे, गणेश ठाकरे, शामा माळचे आदीसह आपल्या परिवारासाह अन् वनकर्मचाऱ्यांसोबत निसर्गरम्य वातावरणात वाढदिवस साजरा केलाय.