बालसंस्कार व व्यक्तिमत्व विकास काळाची गरज* आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल येवला
*बालसंस्कार व व्यक्तिमत्व विकास काळाची गरज*
आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल येवला येथे व्यक्तिमत्व विकास शिबीर व बालसंस्कार शिबिर अनोख्या पद्धतीने साजरे झाले. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण संचलित आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलाचे मा. अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस मा. श्री हनुमंतरावजी भोंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून येवला गुरुकुलामध्ये व्यक्तिमत्व विकास शिबीर व बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रह्मकुमारी नीता दीदी (*संचालिका ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय येवला*) यांना आमंत्रित करण्यात आले होते. नीता दीदी व प्राचार्य कापसे सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी नीता दीदी यांनी पहिल्या सत्रात व्यक्तिमत्व विकास शिबिरात व्यक्तीची जडणघडण ,तसेच जीवन जगण्याच्या पद्धती ,व्यक्तीचा सर्वांगीण विकास म्हणजेच व्यक्तिमत्व विकास ही संकल्पना अतिशय समर्पक शब्दात स्पष्ट केली. तसेच दुसऱ्या सत्रात बालसंस्कार शिबिरात विद्यार्थी कसा घडावा अभ्यास कसा करावा व संस्कार कसे असावे याचे अतिशय छान मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.याच प्रसंगी पालक शिक्षक सभा देखील घेण्यात आली. कार्यक्रमासाठी पालकांचा देखील उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले .