नशामुक्ती अभियान अंतर्गत मुस्लिम धर्मियांच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न – राष्ट्रगीताने समारोप*
*नशामुक्ती अभियान अंतर्गत मुस्लिम धर्मियांच्या क्रिकेट स्पर्धा संपन्न – राष्ट्रगीताने समारोप*
प्रतिनिधी शाहिद खान
रिफॉर्मशन चषक क्रिकेट स्पर्धेत एम ब्रोस -यादगार संघ संघाने रंगरेज शॉपी संघाचा ११ धावांनी पराभव करून चषक पटकाविले.
जळगाव शहरात प्रथमच मुस्लिम समुदायातर्फे फक्त मुस्लिम समाजाच्या नशा मुक्ती अभियाना अंतर्गत रीफॉरमेशन क्रिकेट ट्रॉफी या स्पर्धेचे जीएस ग्राउंड जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते.
यात एकूण निवडक अशा आठ संघाचा समावेश होता व त्या संघातील खेळाडू सुद्धा खुल्या पद्धतीने आयोजकांनी निवड करून संघाच्या मालकांना दिला होता.
*स्पर्धेचे मुख्य उद्देश*
स्पर्धेचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये क्रीडा व आरोग्याची काळजी घेण्याविषयी प्रचार व प्रसार करून त्या सोबत व्यसनाधीन होत चाललेल्या तरुणांना नशा मुक्ती करण्या वर भर देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नशा मुक्ती म्हणजे फक्त दारूच नव्हे तर यात प्रामुख्याने कोणतेही व्यसन त्यात तंबाखू, बार, पान, बिडी, सिगारेट सह मोबाईलचे सुद्धा व्यसन दूर करण्यासाठी हा अभियान साजरा केला जात आहे.
*साखळी पद्धतीचे सामने*
आठ संघात दोन विभाग करून प्रत्येक संघाला तीन सामने खेळणे अनिवार्य होते व त्यानंतर उपांत्य वअंतिम फेरीचे सामने खेळवले गेले प्रत्येक स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला सुद्धा पारितोषिक देण्यात आले.
*स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू* अंतिम सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू रफिक शेख,स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज मुजाहिद सौदागर, गोलंदाज शाहरुख शेख, स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू रफिक शेख यांनी हा बहुमान पटकाविला..
*पारितोषिक वितरण समारंभ*
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू तसेच विजयी व उप विजयी संघांना मुफ्ती आतिकुर रहेमान,मुफ्ती हारुन नदवी, फारूक शेख, कादर कच्ची, एजाज मलिक, इब्राहीम पटेल,वहाब मलिक, अजिज सालार, युसुफ मकरा,
इकबाल मिर्झा, अन्वर खान, वसीम बापू, सत्तार शेख, पीएसआय पोटे, आरिफ देशमुख, नदीम मलिक,डॉ माजिद, डॉ मोईज,डॉ रिझवान, डॉ मिनाझ पटेल,डॉ फारूक शेख,डॉ रिझवान बागवान,निसार खाटीक, हारून पटेल,अक्रम देशमुख, आदींच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धे दार्मियान आमदार राजू मामा भोळे,विरोधी पक्ष नेता सुनील माळी, दीपक आर्डे, आदींनी सुद्धा स्पर्धेचा आनंद लुटला.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन आसिफ मिर्झा तर आभार अडव्होकेट आमीर फारूक यांनी मानले।
स्पर्धा यशस्वीतेसाठी रेहान खाटीक, आसिफ मिर्झा, आमिर शेख, जकी शेख, शारिक शेख, आसिफ पटेल, शोएब बागवान, नदीम खान, आमिर पटेल, शाहरुख शेख, अतिक,तौकिर,तन्वीर,
आकीब, व मासूम आदींनी परिश्रम घेतले
*अंतिम सामनाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत*
अंतिम सामना चे नाणे फेक होताच कॉमेंट्री करणारे अल फैज यांनी क्रीडांगणावरील खेळाडू व प्रेक्षकांना सावधेन तेचा इशारा दिला व राष्ट्रगीताला सुरवात झाली संपूर्ण क्रीडांगणावर राष्ट्र भक्ती चे वातावरण निर्माण झाले.
खेळाळू व प्रेक्षकांनी राष्ट्रगीताला पूर्णपणे सन्मान दिला
फोटो कॅप्शन
खुर्चीवर बसलेले विजयी संघातील खेळाडू तर त्यांचे समोर बसलेल स्पर्धेचे आयोजक व पाठीमागे उभे असलेले प्रमुख अतिथी