संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत येवल्यात छगन भुजबळ यांच्याकडून अभिवादन
*संत रोहिदास महाराज यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत येवल्यात छगन भुजबळ यांच्याकडून अभिवादन*
.
*येवला,दि.५ फेब्रुवारी :-* संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त येवला शहरातील बुंदेलपुरा येथे संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विनम्र अभिवादन केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, मकरंद सोनवणे, प्रा. ज्ञानेश्र्वर दराडे, संतोष खैरनार, सुभाष गांगुर्डे, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, मलिक मेंबर, सुमित थोरात, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, संत रोहिदास महाराज यांनी देशात जाती भेदाच्या विरुद्ध लढण्याचे काम त्यांनी केलं. माणुसकी हा एकमेव धर्म असून तो वाढविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी लढा दिला असे त्यांनी सांगितले.