येवला -येथील महादेव गणपती मंदिर सुताराचा पहा येथे भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त भगवान विश्वकर्मा मूर्तीचे अभिषेक गोविंद पंढरीनाथ राजगुरू यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.
प्रतीनीधी सचिन वखारे ,येवला
विश्वकर्मा पूजा हा एक सण आहे. जेथे कारागीर, शिल्पकार, श्रमिक हे भगवान विश्वकर्माचा उत्सव साजरा करतात. मान्यतेनुसार ब्रह्मदेव ज्यावेळी सृष्टीची निर्मिती करत होते त्यावेळी भगवान विश्वकर्मा यांनी त्यांना मदत केली. भगवान विश्वकर्मा यांना देवतांच्या महलांचे वास्तू शिल्पकार देखील म्हटले जाते. यामुळेच भगवान विश्वकर्मा हे जगातील पहिले अभियंता आणि वास्तू विशारद मानले जातात. विश्व (संसार किंवा ब्रह्मांड) आणि कर्म (निर्माता) या दोन शब्दांपासून विश्वकर्मा शब्द बनला. यामुळेच विश्वकर्मा या शब्दाचा अर्थ जगाचा निर्माता असा होतो. भगवान विश्वकर्मा हे पहिले अभियंता मानले जातात. या दिवशी कारखाने, संस्था, दुकाने या ठिकाणी जे उपकरणे आणि यंत्रे, वापरले जातात या साधनांची पूजा केली जाते.: येवला येथील भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरा
येवला -येथील महादेव गणपती मंदिर सुताराचा पहा येथे भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त भगवान विश्वकर्मा मूर्तीचे अभिषेक गोविंद पंढरीनाथ राजगुरू यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले.
त्याप्रसंगी सत्यनारायणाची महापूजा चे आयोजन करण्यात आले.
तसेच प्रवचन ह भ प सुखदेव महाराज बिऋर हिंसावळकर तालुका नांदगाव यांचे प्रवचनाचे आयोजन केले. तसेच विश्वकर्मा समाजाचे महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमास विश्वकर्मा समाज उत्कर्ष मंडळ, सिद्धेश्वर मित्र मंडळ, विराट विश्वकर्मा संघटना, राष्ट्रीय विश्वकर्मा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आधी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
साठी सचिन वखारे येवला.
श्रावण राजगुरू सिताराम शिंदे दिलीप गायकवाड रामनाथ राजगुरू वाल्मीक राजगुरू रमेश मोरे भास्कर जगताप गुलाबराव राजगुरू ज्ञानेश्वर चव्हाण राजेंद्र भालेराव मंगेश गायकवाड जगदीश सूर्यवंशी गाडेकर सर प्रेमराज शिरसाठ बीके कंडक्टर किरण सूर्यवंशी नितीन राजगुरू बापू राजगुरू भाऊसाहेब राजगुरू नरेंद्र राजगुरू आधी समाज बांधव उपस्थित होते.