छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…* *नगरसुल स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश*
छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून..
*नगरसुल स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश*
*नगरसुल रेल्वे स्थानकात ३ कोटी ४७ लक्ष रुपयांच्या दुसऱ्या पादचारी पूल व कव्हर शेडच्या कामांना मंजुरी*
*नाशिक,येवला, दि.३ फेब्रुवारी :-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील नगरसुल रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक व दोनला जोडण्यासाठी दुसऱ्या पादचारी पूल व कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म ला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी ३ कोटी ४७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले आहे. या कामामुळे प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे.
येवला मतदारसंघातील नगरसुल रेल्वे स्थानकात अधिक सुविधा निर्माण करून स्थानकाचा विकास करावा यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. तसेच रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
त्यानुसार रेल्वे स्थानकाच्या विकासाच्या दृष्टीने विविध कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. आज रेल्वे विभागाच्या वतीने जाहीर दक्षिण मध्य रेल्वे पिंक बुक २०२३-२४ मध्ये नगरसुल रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक १ व दोनला जोडण्यासाठी दुसऱ्या पादचारी पूल व ३०० मी. कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म मंजूर करण्यात आले आहे. यासाठी ३ कोटी ४७ लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच नगरसुल स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. सदर योजनेअंतर्गत या कामाला लवकरच सुरुवात होणार असून प्रवाशांना अधिक सुविधा स्थानकात उपलब्ध होणार आहे.