ऑलम्पियाड परीक्षेत एम. एस. जी. एस. इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.*
प्रतिनीधी सचिन वखारे ,येवला
ऑलम्पियाड परीक्षेत एम. एस. जी. एस. इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ऑलम्पियाड परीक्षेत चमकदार कामगिरी केली. यात स्वरा मयुर सोनवणे हिने गोल्ड मेडल प्राप्त केले.अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मकरंद सोनवणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्कुलचे ९ विद्यार्थी हे जिल्हास्तर दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहे.दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी ही परीक्षा होरिझन अकॅडमी, नाशिक येथे होणार आहे. पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे-
१. स्वरा मयुर सोनवणे (आय.इ.ओ.),
आय.एम.ओ. विद्यार्थी खालील प्रमाणे…
१.माळी पायल भास्कर,
२.माळी तन्वी लक्ष्मण,
३.आवारे श्रद्धा गणेश,
४. क्षीरसागर हर्षदा बंडू,
५. सोनवणे श्रद्धा सोमनाथ,
६.सोनवणे धनश्री भरत,
७.रोठे मयुरी विष्णू,
८. सोनवणे प्रियंका कृष्णा.
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी-मोहम्मद अली अल्ताफ खान, सोनवणे चैतन्य गणेश, खदीजा अल्ताफ खान.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, संचालक प्रा.राजेंद्र गायकवाड, मयुर सोनवणे, जीवन गाडे, उज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, डॉ.भागीनाथ जाधव, आकाश सोनवणे, जनार्दन जानराव, संगीताताई सोनवणे. यांनी अभिनंदन केले व पुढील परीक्षेस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी स्कुलचे प्रिंसिपल अल्ताफ खान,अजहर खतीब, दीपक खैरनार, अमोल आहेर, गणेश सोनवणे, प्रशांत बिवाल, अमजद अंसारी, गौरव सैंदाने, माधुरी माळी, सुनीता वडे, चेतना माकूने, शर्मिला पवार, नीलिमा देशमुख, अर्चना एंडाईत, सुश्मिता देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अजहर खतीब यांनी केले.