नाशिकचे स्टार्टअप रिवॅम्प मोटोला राष्ट्रीय पुरस्कार रोख पारितोषिकांसह व्यवसाय विस्तारासाठी मिळणार संधी
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त नाशिकचे स्टार्टअप रिटॅम्प मोटोसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना संस्थापक जयेश टोपे व सहकारी.
———
नाशिकचे स्टार्टअप रिवॅम्प मोटोला राष्ट्रीय पुरस्कार रोख पारितोषिकांसह व्यवसाय विस्तारासाठी मिळणार संधी
प्रतिनिधी इंदिरानगर –
राष्ट्रीय स्टार्टअप दिना
निमित्त दिल्ली येथे पुरस्कार सोहळ्यात नाशिक येथिल इलेक्ट्रिक
बाईक क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक मिळविलेल्या स्टार्टअप रिवॅम्प मोटो प्राय्व्हेट लिमिटेड यांना राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड २०२२ ने सन्मानित करण्यात आले आहे.
दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते जयेश टोपे,प्रीतेश महाजन व पुष्कराज साळुंके या सहकार्यांनी हा पुरस्कार स्वीकारला रोख पारितोषिकांसह व्यवसाय वृद्धीची संधी या पुरस्काराच्या माध्यमातून मिळणार आहे.या
मध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या देशभरातील निवडक स्टार्टअप्सला आमंत्रित करण्यात आले होते. सोहळ्या दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी स्टार्ट
अप्सची घोषणा करण्यात आली.यामध्ये दळणवळणाच्या गटातून ट्रान्स्पोर्ट सव्हस अॅण्ड इन्फ्रान्स्ट्रक्चर या प्रकारातून या स्टार्टअपची निवड करण्यात आलेली आहे. पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपयांचे रोख पारितोषिक असे आहे. तसेच गुंतवणूकदार, कॉर्पोरेट क्षेत्रासमोर सादरीकरणाची संधी पुरस्कारार्थी स्टार्टअप्सला मिळणार आहे.
कोट
मल्टीयुटीलिटी अर्थात बहुउपयोगी असे “रिवॅम्प मित्रा” हे ई-वाहन रिटॅम्प मोटो या स्टार्टअपतर्फे विकसित करण्यातआलेले
आहे.याअभिनव संकल्पनेला
गुंतवणूकदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळालेला असून,नाशिकच्या या स्टार्टअपमध्ये दिग्गजांनी गुंतवणूकदेखील केलेली आहे.नाशिकच्या भूमीतून विकसित झालेल्या या स्टार्टअपसाठी वाहन निर्मितीचा कारखाना नाशिकलाच उभारण्याचा मानस जयेश टोपे व सहकार्यांनी व्यक्त केला आहे. जयेश टोपे,प्रीतेश महाजन व पुष्कराज साळुंके यांनी मिळून हे स्टार्टअपविकसित केले आसल्याचे सांगितले.
: 94215 65476
अधिक माहिती साठी